४ चेंडूत ८९ धावा…

जागतिक क्रिकेटमध्ये बांगलादेश हा जरी एक तळातील संघ असला तरी या देशात अनेक क्रिकेटचे विक्रम झाले आहे. अगदी वॉटसनच्या ९६ चेंडूत १८५ धावांची खेळी पण आपण याच भूमीत पहिली. असाच एक नवा विक्रम बांगलादेशमधील ढाका शहरात काल झाला. ढाका येथे सुरु असलेल्या द्वितीय स्तरावरील एका सामन्यात एका संघाने चक्क ४ चेंडूत ८९ धावांचे लक्ष पार करून सामना जिंकला.

पहिल्यांदा फलंदाजी करताना ढाका लीगमधल्याएका सामन्यात लालमाठिया क्लबने१४ षटकांत सर्व बाद ८८ धावा केल्या आणि प्रतिस्पर्धी एक्झिम क्रिकेटर्सला २० षटकांत ८९ धावांचे लक्ष दिले. जे लक्ष एक्झिम क्रिकेटर्सने चक्क ४ चेंडूत पूर्ण केले.

लालमाठिया क्लबची जेव्हा गोलंदाजीची वेळ आहे तेव्हा सुजान मेहमूद या गोलंदाजाकडे चेंडू सोपविण्यात आला आणि त्याने चक्क पहिल्याच षटकात ८० वाइड चेंडू टाकले. त्याने जे उर्वरित चेंडू टाकले त्यात एक्झिम क्रिकेटर्सने ९ धावा करत विजय मिळविला. क्रिकेटच्या नियम क्रमांक २५ प्रमाणे वाइड चेंडू हा मोजता येत नसल्या कारणाने एक्झिम क्रिकेटर्सने चक्क ४ चेंडूत ८९ धावांचे लक्ष पार केले.

संक्षिप्त धावफलक:
लालमाठिया क्लब सर्वबाद ८८ धावा, १४ षटकात
एक्झिम क्रिकेटर्स ८९ धावा, ४ चेंडू
एक्झिम क्रिकेटर्स १० विकेट्स आणि आणि तब्बल १९.२ षटक राखून विजयी!