टाॅप४- या संघांसोबत केले आहे सर्वाधिक संघांनी कसोटी पदार्पण

बेंगलोर | आज भारत विरुद्ध अफगानिस्तान हा कसोटी सामना सध्या सुरु आहे. हा सामना अफगानिस्तानचा पहिलाच कसोटी सामना आहे. याबरोबर कसोटी पदार्पण करणारा अफगानिस्तान १२ देश बनला.

इंग्लंड आणि आॅस्ट्रेलिया यांच्यात इतिहासातील पहिला कसोटी सामना झाल्यावर त्यानंतर प्रत्येक संघाने एखाद्या संघासोबत सामना खेळत कसोटी पदार्पण केले आहे.

यात इंग्लंड संघाविरुद्ध सर्वाधिक ६ संघानी कसोटी पदार्पण केले आहे. या संघासोबत आॅस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्युझीलंड, विंडीज, भारत आणि श्रीलंकेचा समावेश आहे.

भारत या यादीत दुसऱ्या यादीत असुन भारताविरुद्ध पाकिस्तान, झिबांब्वे, बांगलादेश आणि आज अफगाणिस्तान देशाने कसोटी पदार्पण केले आहे.

पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड संघाने तर अाॅस्ट्रेलिया संघाविरुद्ध इंग्लंड संघाने कसोटी पदार्पण केले आहे.

पदार्पणात कसोटी सामना जिंकण्याचा पराक्रम केवळ आॅस्ट्रेलिया संघाने केला आहे. त्यांनी कसोटी इतिसात जो सामना पहिला झाला होता तो इंग्लंविरुद्ध जिंकला होता.

तर झिंबांब्वे असा संघ आहे ज्याने आपला पहिला सामना अनिर्णित राखला होता. हा सामना भारताविरुद्ध झाला होता.