७ तासांत आयपीएलमध्ये १०६ कोटींची उधळणं

मंगळवारी(18 डिसेंबर) आयपीएल 2019 चा लिलाव जयपूर येथे पार पडला आहे. या लिलावात प्रत्येक संघाने युवा खेळाडूंवर बोली लावण्याला पसंती दिली आहे. या लिलावात 346 खेळाडूंचा 70 जागांसाठी लिलाव होणार होता.

त्यानुसार या लिलावात 346 खेळाडूंमधूल एकूण 60 खेळाडूंवर बोली लागली. त्यात 40 भारतीय आणि 20 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. या 60 खेळाडूंवर बोली लावताना 8 संघानी मिळून 106 कोटी 80 लाख रुपये खर्च केले आहेत.

यावर्षीच्या आयपीएल लिलावात मागील वर्षीप्रमाणेच जयदेव उनाडकट हा वेगवान गोलंदाज सर्वात महागडा कॅप(किमान एक आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला खेळाडू) खेळाडू ठरला आहे. त्याला राजस्थान रॉयल्सने 8 कोटी 40 लाख रुपयांची बोली लावत संघात घेतले आहे.

त्याच्याप्रमाणेच तमिळनाडूचा फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्थी हा देखील यावर्षीचा आयपीएल लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्यालाही 8 कोटी 40 लाखांची बोली लावत किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने संघात सामील करुन घेतले आहे.

तो यावर्षी अनकॅप(एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेला खेळाडू) खेळाडूंमध्येही सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

त्याचबरोबर इंग्लंडचा 20 वर्षीय अष्टपैलू क्रिकेटपटू सॅम करन सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला आहे. त्याच्यावर किंग्ज पंजाबने 7 कोटी 20 लाखांची बोली लावली आहे.

तसेच कॉलिन इंग्राम हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागडा खेळाडू ठरला असून दिल्ली कॅपिटल्स संघाने त्याला 6 कोटी 40 लाखांची बोली लावत संघात घेतले आहे. याबरोबरच कर्लोस ब्रेथवेट, अक्षर पटेल, मोहित शर्मा आणि शिवम दुबे यांना 5 कोटी रुपयांची बोली लागली आहे.

मात्र यावर्षीच्या आयपीएलमध्ये ब्रेंडन मॅक्यूलम, कोरे अँडरसन, डेल स्टेन अशा अनेक दिग्गज क्रिकेटपटूंना कोणत्याच संघाने पसंती दाखवलेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या:

असे असतील २०१९ च्या आयपीएलसाठी सर्व संघ…

२०१९ च्या आयपीएल लिलावात या ६० खेळाडूंवर लागली बोली

माझं काय चुकलं सांगा, आयपीएलमध्ये स्थान न मिळालेल्या खेळाडूचा त्रागा