ऑस्ट्रेलियासह या तीन देशांनी केला आहे हा मोठा कारनामा

दिल्ली। बुधवारी(13 मार्च) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात फिरोजशहा कोटला स्टेडियमवर झालेल्या पाचव्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने 35 धावांनी विजय मिळवला. तसेच ऑस्ट्रेलियाने 5 सामन्यांची वनडे मालिकाही 3-2 अशा फरकाने जिंकली.

या मालिकेत भारताने पहिले दोन सामने जिंकून 2-0 अशी आघाडी घेतली होती. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन करत पुढील तीनही सामने जिंकून मालिकाही जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

त्यामुळे 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत पहिले दोन सामने पराभूत झाल्यानंतरही 3-2 अशा फरकाने मालिका जिंकणारा ऑस्ट्रेलिया हा चौथा देश ठरला आहे.

यापूर्वी असा कारनामा दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि पाकिस्तानने केला आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेने असा पराक्रम दोन वेळा केला आहे. त्यांनी 2003 मध्ये पाकिस्तान विरुद्ध तर 2016 मध्ये इंग्लंड विरुद्ध असा विक्रम केला आहे.

तसेच बांगलादेशने 2005 मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध आणि पाकिस्ताननेही 2005 मध्येच भारताविरुद्ध हा कारनामा केला होता.

विशेष म्हणजे भारताला दोन वेळा अशाप्रकारे पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत पहिले 2 सामने जिंकल्यानंतरही 2-3 अशा पराभवाला दोन वेळा सामोरे जाणारा भारत पहिलाच देश ठरला आहे.

बुधवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 50 षटकात विजयासाठी 273 धावांचे आव्हान दिले होते. पण भारताला 237 धावाच करता आल्या.

महत्त्वाच्या बातम्या –

४१वे अर्धशतक करणाऱ्या रोहित शर्माने केली गांगुलीच्या ‘दादा’ विक्रमाची बरोबरी

‘सलामीवीर’ रोहित शर्माने या दिग्गजांच्या यादीत मिळवले अव्वल स्थान…

पंतप्रधान मोदींची धोनीला विनंती, कृपया एवढं काम करच