पुणे आयटी कप क्रिकेट स्पर्धेत टेक महिंद्रा, कॉग्निझंट, यार्डी संघाचे विजय     

पुणे: टेक महिंद्रा, कॉग्निझंट, यार्डी सॉफ्टवेअर या संघांनी पुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली. नेहरू स्टेडियमवर झालेल्या लढतीत टेक महिंद्रा संघाने मास्टरकार्ड संघावर ९ गडी राखून शानदार विजय मिळवला.
टेक महिंद्राच्या गोलंदाजांनी अचूक मारा करून मास्टरकार्डच्या संघाला अवघ्या ३४ धावांत गुंडाळले. यानंतर टेक महिंद्रा संघाने विजयी लक्ष्य एक गडीच्या मोबदल्यात पूर्ण केले. दुस-या लढतीत टीसीएस संघाने सनगार्ड संघावर सात गडी राखून विजय मिळवला.
यानंतर सीबीएसएल संघाने अटोससिंटेल संघावर पाच गडी राखून विजय मिळवला. अटोससिंटेल संघाने दिलेले १४२ धावांचे लक्ष्य सीबीएसएल संघाने पाच गडींच्या मोबदल्यात पूर्ण केले. चौथ्या लढतीत सायबेज संघाने झेन्सर संघावर ९० धावांनी मात केली.
सायबेज संघाने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १८० धावांपर्यंत मजल मारली. यानंतर झेन्सर संघाला ९० धावांत रोखले. पूना क्लबवर झालेल्या लढतीत यार्डी सॉफ्टवेअर संघाने सिमन्स संघावर नऊ गडी राखून सहज विजय मिळवला. यात स्वप्नील घाटगेने ५८ चेंडूंत १६ चौकार व ४ षटकारांसह नाबाद १०२ धावांची खेळी केली.
संक्षिप्त धावफलक – १) मास्टरकार्ड – १३.५ षटकांत सर्वबाद ३४ (मंदार एन. १०, सचिन कुलकर्णी २-१, स्वप्नील २-६, गुरप्रीतसिंग १-५, सचिन पिंपरीकर १-८, प्रतीक दुबे १-६)  पराभूत वि.  टेक महिंद्रा – ३.५ षटकांत १ बाद ३५ (जावेद सय्यद १७, सचिन पिंपरीकर नाबाद १०, ईशान शिंदे १-२८).
२) सनगार्ड – २० षटकांत ८ बाद १०५ (अनिल ३३, प्रणय कानोजे १४, राहुल गर्ग २-११, तेजपालसिंग २-१४) पराभूत वि. टीसीएस – १४.३ षटकांत ३ बाद १०७ (गौरव भालेराव नाबाद ३८, राहुल गर्ग २२, शांतनू नाडकर्णी १५, अनिल १-१९, पवन आनंद १-१४).
३) अटोससिंटेल – १९.५ षटकांत सर्वबाद १४१ (तन्मय पाडवे २७, अजितकुमार प्रधान २१, उज्ज्वल ठुसू १९, सचिन शेलार ३-२४, तनिष ठस्कर २-२९) पराभूत वि. सीबीएसएल – १८ षटकांत ५ बाद १४३ (अतिफ ५०, मनीष ४१, सबिर शेख १-३३, अभिनव आनंद १-२१).
४) सायबेज – २० षटकांत ५ बाद १८० (प्रतीक पंडित ६५, सौरभ रावळ ५१, अकिब पीरझादे ३-२४, मुझमिल खान १-२४) वि. वि. झेन्सर -१७.५ षटकांत सर्वबाद ९० (भरत झव्हेरी ३९, सौरभ रावळ २-१४, निखिल गिरासे २-१६, राकेश शिंदे २-२७, प्रतीक पंडित २-०).
५) इंडियन बँक – २० षटकांत ८ बाद १६९ (आदित्य साळुंखे ६२, सुदर्शन राणा ४३, अर्जुन शिंदे ३२, सिवा प्रसाद २-२६, गिरीश एखंडे २-२७, विजयकुमार १-२८) वि. वि. आयबीएम – २० षटकांत ७ बाद १५६ (धरमवीरसिंग ३७, विनय पालुरू ३०, तुषार खिरिड ३-९, निपुन भंडारी २-२२).
६) एचएसबीसी – २० षटकांत ८ बाद १५३ (जय भाटिया ३१, नवीद श्रीनिवास ३१, संजय लोखंडे २१, प्रशांत कित्तुरे नाबाद २६, अंबर डी ३-४०, निरंजन फडणवीस ३-१३) वि. वि. केपीआयटी – १७.२ षटकांत सर्वबाद १३८ (तुषार वैंगणकर ५८, अलोक नागराज ३०, संजय लोखंडे ५-२६, श्रावण नाईक ३-३८).
७) सिमन्स – २० षटकांत ९ बाद १४३ (सौम्या एम. ४६, मनोज भागवत २०, प्रभुल ३-३८, गौतम तुळपुळे ३-१२) पराभूत वि. यार्डी – १४.३ षटकांत १ बाद १४४ (स्वप्नील घाटगे नाबाद १०२, अमित राडकर ३३).