पोस्टर बॉय राहुल चौधरीचा प्रो कबड्डीमध्ये भीमपराक्रम

पुणे | प्रो कबड्डीचा 86 वा सामना आज(28 नोव्हेंबर) बंगळूरु बुल्स विरुद्ध तेलुगू टायटन्स संघात पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरु आहे. हा सामना तेलुगू टायटन्स संघाचा स्टार रेडर आणि भारतीय कबड्डीचा पोस्टर बाॅय राहुल चौधरीसाठी खास ठरला आहे.

कारण तो प्रो कबड्डी इतिहासात 800 गुण घेणारा पहिला खेळाडू ठरला आहे. हा विक्रम राहुलने प्रो कबड्डीमधील त्याच्या 91 व्या सामन्यात केला आहे. तसेच हा पराक्रम त्याने सामन्यातील 8 व्याच मिनिटाला केला.

या सामन्याआधी त्याला हा विक्रम करण्यासाठी 3 गुणांची गरज होती. तसेच त्याने आजपर्यंत खेळलेल्या 90 सामन्यात 797 गुण घेतले होते. यात त्याने 750 गुण रेडींगमधून तर 47 गुण टॅकलचे मिळवले आहेत. प्रो कबड्डीत सर्वाधिक गुण घेणाऱ्या खेळाडूंमध्ये तो अव्वल स्थानी आहे.

प्रो कबड्डीत आजपर्यंत 304 खेळाडूंनी एकतरी गुण कमावला आहे. या सर्वांमध्ये राहुल हा 800 गुणांसह अव्वल स्थानी आहे.

राहुलपाठोपाठ दुसऱ्या स्थानी डुबकी किंग परदिप नरवाल असून त्याने 77 सामन्यात 778 गुण कमावले आहे. परदिपलाही या हंगामात 800गुण कमावण्याची संधी आहे.

राहुलला या हंगामात लौकीकाला साजेल अशी कामगिरी अजूनपर्यंत तरी करता आली नाही. त्याने या सामन्याआधी या हंगामात 11 सामन्यांत 87 गुण घेतले होते. राहुल चौधरीने प्रो कबड्डीचे सर्व मोसम एकाच संघाकडून म्हणजेच तेलगू टायटन्स संघाकडून खेळले आहेत.

प्रो कबड्डीमध्ये सर्वाधिक गुण मिळवणारे कबड्डीपटू:

800* – राहुल चौधरी (91 सामने)

778 – परदीप नरवाल (77 सामने)

688 – अजय ठाकूर (95 सामने)

680 – दीपक हुडा (93 सामने)

602* – काशिलिंग अडके (87 सामने)

महत्त्वाच्या बातम्या:

हॉकी विश्वचषक २०१८: भारताचे दक्षिण आफ्रिकेवर वर्चस्व कायम

हॉकी विश्वचषक २०१८: कॅनडाला पराभूत करत बेल्जियमची विजयी सुरूवात

Video: गोलंदाजांना सराव देताना तोल गेल्याने स्मिथ पडला खाली