प्रो कबड्डीत हा मोठा पल्ला पार करणारा तेलुगू टायटन्स केवळ दुसराच संघ

प्रो कबड्डी सीजन 7 मध्ये काल तेलुगू टायटन्स विरुद्ध दबंग दिल्ली यांच्यात झालेल्या चुरशीच्या सामन्यांत दबंग दिल्ली ने ३४-३३ असा विजय मिळवला. या सामन्यात तेलुगू टायटन्सला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी त्यांनी या सामन्यात एक खास टप्पा पार केला आहे.

तेलुगू टायटन्सने प्रो कबड्डीमध्ये चढाईत २००० गुणाचा पल्ला पार केला. त्यामुळे हा मोठा टप्पा पार करणारा तेलुगू टायटन्स हा दुसराच संघ ठरला. याआधी सीजन ६ मध्ये पाटणा पायरेट्सने हा पल्ला पूर्ण केला होता. आता पाटनाच्या खात्यात चढाईत २२८३ गुण आहेत.

कालच्या सामन्याआधी तेलुगू टायटन्सच्या खात्यात चढाईचे १९८६ गुण होते. त्यामुळे त्यांनी दबंग दिल्लीविरुद्ध चढाईत २७ गुण मिळवत चढाईत २००० गुणांचा पल्ला सहज पार केला. २७ पैकी २६ गुण तर सुरज आणि सिद्धार्थ या देसाई बंधूनी मिळवले.

कालच्या सामन्यांत सुरज देसाईने प्रो कबड्डीत पदार्पण करताना सर्वाधिक १८ गुण मिळवले. तर दिल्लीकडून नवीन कुमारने सर्वाधिक १४ गुण मिळवले.

प्रो कबड्डीमध्ये चढाईत सर्वाधिक गुण मिळणारे संघ –
पाटणा पायर्ट्स- २२८३
तेलुगू टायटन्स- २०११
यु मुंबा- १९७६
बेंगळुरू बुल्स- १९२७
बंगाल वॉरियर्स- १८३४

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

प्रो कबड्डी: भाऊ माझा पाठीराखा! सुरज देसाईने मोडला भाऊ सिद्धार्थचा विश्वविक्रम!

गौतम गंभीर आता क्रिकेटच्या नाही तर उतरला कबड्डीच्या मैदानात!