रिशांक देवाडिगाबद्दल या १० गोष्टी आपल्याला माहित आहेत का ?

यु पी योध्दाचा स्टार खेळाडू रिशांक याला कबड्डीचे चाहते त्याच्या डू ऑर आय रेडसाठी ओळखतात. परंतु त्याने युपीचा नियमित कर्णधार नितीन तोमर याच्या अनुपस्थितीत युपी संघाची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली. जयपूर विरुद्धच्या सामन्यात त्याने २८ रेडींग गुण मिळवून आपले नाव प्रो कबड्डीच्या इतिहासात कायमचे नोंदवले आहे.

त्याच्याबद्दलच्या काही अश्या गोष्टी ज्या सर्वांना माहित हव्यात:

#१० प्रो कबड्डीमधील रिशांकचा पहिला संघ यु मुंबा-
रिशांक प्रो कबड्डीच्या पहिल्या मोसमात यु मुंबा संघासाठी करारबद्ध केला गेला होता. त्याला पहिल्या मोसमामध्ये ५ लाख रुपये इतकी किंमत मिळाली होती. रिशांक यु मुंबासोबत पहिले चार मोसम जोडलेला राहिला. मुंबासाठी खेळताना त्याने ५९ सामन्यात ३२० गुण मिळवले. त्यात २८४ गुण रेडींगमधील होते तर ३६ गुण त्याने डिफेन्समध्ये कमवले होते.

#९ खाजगी आयुष्य-
रिशांकचा जन्म मुंबई सांताक्रूझ येथील आहे. तो सध्या कर्नाटक मधील गंगोली येथे राहतो. त्याचे संपूर्ण बालपण मुंबईत गेले. रिशांक लहान असतानाचे त्याच्या वडिलांचे निधन झाले. तो त्याच्या आई आणि बहिणीसोबत राहतो. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी त्याच्या आईने स्वीकारली, त्या एका ब्यूटी पार्लरमध्ये काम करत असत.

रिशांकचे शालेय शिक्षण अँथोनी हाय स्कूल येथून पूर्ण झाले. त्याने पुढे चेतना हजारीमल सोमानी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स येथून त्याने कॉमर्समधील पदवी घेतली.

#८ कबड्डी खेळाची सुरुवात-
रिशांकने वयाच्या ६-७व्या वर्षी कबड्डी खेळायला सुरुवात केली. त्यानंतर जेव्हा त्याला समजले की आपण बाकीच्या खेळाडूंपेक्षा मजबूत आहोत आणि आपले कौशल्ये उत्तम आहेत तेव्हा त्याने कबड्डीकडे लक्ष पुरवण्यास सुरुवात केली. त्याच्या आईला त्याचे खेळणे जास्त आवडत नसे. कारण त्यांना असे वाटायचे की या खेळामुळे त्याला दुखापत होऊ शकते त्याचबरोबर त्याचे शैक्षणीक नुकसान देखील होऊ शकते.

#७ सुरुवातीच्या काळातील संघर्ष-
कुटुंब आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे त्याला शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागले. त्यानंतर त्याने ‘लीला हॉटेल’ येथे वेटर म्हणून त्याने काम केले. काम आणि खेळ यांच्या वेळाची सांगड त्याने आपले कबड्डीवर लक्ष पुरवले.

#६ पहिली संधी-
रिशांकला मुंबई जिल्हा संघात स्थान मिळाले. त्यानंतर त्याला देना बँक प्रायोजक म्हणून लाभले आणि त्या स्पर्धेत त्याने उत्तम कामगिरी करत त्याने स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून उदयास आला. त्यानंतर त्याने आपल्या कुटुंबियांशी चर्चा करून काम सोडले आणि व्यावसायिक कबड्डी प्लेयर बनण्यासाठी प्रयन्त चालू केले.

#५ खेळाचा प्रवास –
देना बँकसाठी खेळण्यासोबतच तो भारत पेट्रोलियम आणि महाराष्ट्र संघासाठी देखील खेळात होता. या दोन्ही संघातही खेळत असल्याने त्याला प्रो कबड्डीमध्ये स्थान मिळाले आणि त्याला यु मुंबा संघाने ५ लाख रुपये देऊन करारबद्ध केले.

#४ भारतीय संघात संधी-
प्रो कबड्डीमधील उत्तम कामगिरीच्या जोरावर त्याला २०१५ साली भारतीय संघात निवडले गेले. तो त्या मोसमात सर्वात कमी वयाचा खेळाडू होता. त्याची भारतीय संघाप्रती असलेली निष्ठा आणि परिश्रम याच्या जोरावर त्याने भारतीय संघात आपले स्थान मजबूत केले.

#३ युपी योद्धाकडून मिळालेली भरघोस रक्कम-
प्रो कबड्डीच्या पहिल्या मोसमात त्याला ५ लाख रुपये मिळाले होते तर पाचव्या मोसमात प्रो कबड्डीमध्ये पुन्हा पूर्ण लिलाव झाला. या लिलावात त्याला युपी योद्धा संघाने ४५.५० लाख रुपये किंमत देऊन करारबद्ध केले.

#२ एका सामन्यात सर्वाधिक गुणांचा विक्रम –
प्रो कबड्डी जयपूर लेगमध्ये १२ ऑक्टोबर रोजी घरेलू संघ जयपूर विरुद्ध खेळताना त्याने एका सामन्यात २८ रेडींग गुण मिळवत त्याने विक्रम केला. त्याअगोदर तो विक्रम काशीलिंग अडकेच्या नावावर होता.

#१ यु मुंबाची तिकडी-
यु मुंबा साठी खेळताना रिशांकने खूप जबरदस्त कामगिरी केली. मुंबाचा संघ पहिले तीन मोसम सलग तीन वेळा अंतिमफेरीमध्ये पोहचला होता. दुसऱ्या मोसमात मुंबाने स्पर्धा जिंकली होती. तिसऱ्या मोसमात अनुप कुमार, राकेश कुमार आणि रिशांक यांची खूप जबरदस्त सांघिक कामगिरी होत होती. रिशांकला घडवण्यात अनुप कुमार आणि राकेश कुमार यांचा खूप मोठा हात राहिला आहे.