रवी शास्त्रीने अर्ज करावा म्हणून मास्टर ब्लास्टरने केली मनधरणी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एक पाऊल पुढे येत भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू मुंबईकर रवी शास्त्रीला भारतीय प्रशिक्षक पदासाठी अर्ज करायला लावल्याचं वृत्त आहे. आपण या पदासाठी आता कोणत्याही रांगेत येऊन उभे राहणार नसल्याचं रवी शास्त्रीने आधीच स्पष्ट केल्यामुळे सचिनने ही मनधरणी केल्याचं समजतं.

सचिनच्या ह्या विंनतीला मान देऊन सध्या समालोचनाची भूमिका पार पाडत असलेल्या रवी शास्त्रीने अर्ज करायला तयारी दाखवली.

गेल्या वर्षी प्रशिक्षक म्हणून चांगली कामगिरी करूनही जाणूनबुजून डावललं गेल्यामुळे रवी शास्त्री नाराज होता. त्यामुळे ह्या पदासाठी आपण पुन्हा रांगेत उभं राहणार नसल्याचं शास्त्रीने आधीच स्पष्ट केलं होत.

सध्या रवी शास्त्री हा लंडन शहरात सुट्ट्यांचा आनंद घेत असून मास्टर ब्लास्टर सचिनसुद्धा कुटुंबासोबत त्याच शहरात असल्याकारणाने सचिनने शास्त्रीशी संपर्क साधला. कोहली हा सुद्धा तुझ्याबरोबर काम करायला उत्सुक असल्याची गोष्ट क्रिकेट सल्लागार समितीचा सदस्य असलेल्या सचिनने शास्त्रीला सांगितलं असल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियामध्ये आले आहे.

गेल्या वर्षी प्रशिक्षक पदासाठी मुलाखत सुरु असताना प्रशिक्षक म्हणून सचिनने शास्त्रीला तर गांगुलीने कुंबळेला पसंती दार्शवली होती. त्यामुळे व्ही.व्ही. एस. लक्ष्मणच मत विचारात घेण्यात आलं आणि त्याने आपलं मत कुंबळेच्या पारड्यात टाकलं होत.