मास्टर ब्लास्टर म्हणतो कुलदीपने फक्त चांगली गोलंदाजी नाही केली तर…

कोलकाता । काल भारताकडून वनडेत केवळ तिसरी हॅट्रिक घेणाऱ्या कुलदीप यादववर दिग्गजांच्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यात भारतीय कर्णधारापासून ते अनेक माजी खेळाडूंचा समावेश आहे.

आजकाल सोशल माध्यमांवर चांगलाच सक्रिय झालेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही या गोलंदाजांचे कौतुक करत आहे. सचिनने यासाठी खास ट्विट केला आहे.

सचिन आपल्या ट्विटमध्ये म्हणतो, ” कुलदीप यादव आणि युझवेन्द्र चहल यांनी फक्त चांगली गोलंदाजी केली नाही तर सामना भारताकडे खेचून आणला आहे. विराट आणि अजिंक्यने चांगली फलंदाजी केली. “

सचिनचा इंग्लिश भाषेतील हा ट्विट:
@imkuldeep18 & @yuzi_chahal didn’t just bowl well but actually spun the game in India’s favour! Superb batting @imVkohli & @ajinkyarahane88

या मालिकेतील तिसरा वनडे सामना होळकर क्रिकेट स्टेडियम, इंदोर येथे २४ सप्टेंबर रोजी होणार आहे.