नॅशनल सिरीज् टेनिस स्पर्धेत समीक्षा श्रॉफ, स्वरा काटकर, कायरा शेट्टी, सोनल पाटील, ईरा शहा यांची आगेकूच

पाचगणी । रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल 14 वर्षाखालील नॅशनल सिरीज् टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात समीक्षा श्रॉफ, सायना देशपांडे, ईरा शहा, कायरा शेट्टी, स्वरा काटकर, सोनल पाटील, सारा गजभीये, अन्या जेकब या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत 14 वर्षाखालील मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या ईरा शहाने आपलीच राज्य सहकारी माहिका गुप्ताचा 6-3, 6-4असा संघर्षपूर्ण पराभव केला.

महाराष्ट्राच्या कायरा शेट्टीने तामिळनाडूच्या एसआर अनन्याचा 6-2, 6-2 असा तर, स्वरा काटकरने उत्तरप्रदेशच्या सौमरिता वर्माचा 6-4, 6-1असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. महाराष्ट्राच्या सोनल पाटीलने तेलंगणाच्या श्रीवल्ली मेडीशेट्टीवर 7-5, 6-0असा विजय मिळवला. अन्या जेकबने हरियाणाच्या दिशा सेहरावतचा 4-6, 6-2, 6-2असा तीन सेटमध्ये पराभव केला.

14 वर्षाखालील मुलांच्या गटात दुसऱ्या फेरीत अव्वल मानांकित गुजरातच्या विशेष पटेलने विमल गगनचा 6-1, 6-1असा सहज पराभव केला. महाराष्ट्राच्या सोळाव्या मानांकित शिवम कदम याने हरियाणाच्या अग्रिया यादवचा 6-3, 6-1असा पराभव करून करून उप-उपांत्यपूर्व फेरी गाठली. अकराव्या मानांकित कर्नाटकाच्या रोनीन लोटलीकरने स्कंधा रावचा 6-2, 6-1असा पराभव करून आगेकूच केली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: 14 वर्षाखालील मुली: पहिली फेरी: लक्ष्मी अरुणकुमार(तामिळनाडू)वि.वि.अथमिका श्रीनिवास(कर्नाटक)6-1, 6-3; समीक्षा श्रॉफ(महा)वि.वि.रिद्धी चौधरी 6-3, 7-5; सायना देशपांडे(महा)वि.वि.नैना गुलाटी(दिल्ली)6-0, 6-0; ईरा शहा(महा)वि.वि.माहिका गुप्ता(महा)6-3, 6-4; कायरा शेट्टी(महा)वि.वि.एसआर अनन्या(तामिळनाडू)6-2, 6-2; विद्युल मणिकांती(कर्नाटक)वि.वि.वैष्णवी वकीती(तेलंगणा)6-1, 6-2; हर्लीन धांडा(पंजाब)वि.वि.जेनी संथनाकुमार(तामिळनाडू)6-3, 6-2; स्वरा काटकर(महा)वि.वि.सौमरिता वर्मा(उत्तरप्रदेश)6-4, 6-1; सोनल पाटील(महा)वि.वि.श्रीवल्ली मेडीशेट्टी(तेलंगणा)7-5, 6-0; अभया वेमुरी(तेलंगणा)वि.वि.सुहिता मारूरी(कर्नाटक)6-3, 6-1; पवित्रा पारीख(गुजरात)वि.वि.रुमा गायकैवारी(महा) 7-5, 6-1; सारा गजभीये(महा)वि.वि.सोहा पाटील(महा) 6-3, 6-2; अन्या जेकब(महा)वि.वि.दिशा सेहरावत(हरियाणा)4-6, 6-2, 6-2; कनिस्का श्रीनाथ(कर्नाटक)वि.वि.निराली पदनिया(तेलंगणा)7-5, 6-1;

14 वर्षाखालील मुले: दुसरी फेरी: विशेष पटेल(गुजरात)(1)वि.वि.विमल गगन 6-1, 6-1; शिवम कदम(महा)(16)वि.वि.अग्रिया यादव(हरियाणा)6-3, 6-1; रोनीन लोटलीकर(कर्नाटक)(11)वि.वि.स्कंधा राव(कर्नाटक) 6-2, 6-1; अरुणवा मजुमदार(पश्चिम बंगाल)(6)वि.वि.मनदीप रेड्डी(कर्नाटक)6-3, 6-0; आयुष भट(कर्नाटक)(3)वि.वि.कुशल चौधरी(महा) 6-0, 6-0;