विंम्बलडन २०१८: लोकल बॉय काइल एडमंडचा पराभव करत नोव्हाक जोकोविच चौथ्या फेरीत

सर्बियाच्या १२ व्या मानांकित नोव्हाक जोकोविचने लोकल बॉय काइल एडमंडचा पराभव करत विंम्बलडन स्पर्धेच्या पुरुष ऐकेरीतील चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे.

शनिवारी (६ जुलै) रोजी नोव्हाक जोकोविच वि. इंग्लंडच्या काइल एडमंड यांच्यात तिसऱ्या फेरीतील सामना झाला.

यामध्ये पहिला सेट सेट  गमावणाऱ्या जोकोविचने दुसरा आणि तिसरा सेट जिंकत सामन्यात दमदार पुणरागमन करत काइल एडमंडवर मात केली.

नोव्हाक जोकोविचने २१ व्या मानांकित काइल एडमंडला ४-६, ६-३, ६-२, ६-४ अशा फरकाने पराभूत करत घरचा रस्ता दाखवला.

पहिल्या सेटमध्ये अडखळत खेळणाऱ्या जोकोविचने दुसऱ्या सेटपासून आक्रमक खेळ केला. याचा फायदा त्याला उर्वरित सामन्यात झाला.

पहिल्या सेटचा अपवाद वगळता संपूर्ण सामन्यात नोव्हाक जोकोविचने काइल एडमंडवर एकहाती वर्चस्व राखले.

नोव्हाक जोकोविचचा सोमवारी (१० जुलै) चौथ्या फेरीचा सामना कॅरेन खॅचेनोव्हच्या विरुद्ध होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-एशियन गेम्ससाठी भारतीय महिला आणि पुरुष कबड्डी संघाची घोषणा

-२०१० साली झालेल्या आयपीएल स्पर्धेतील मोठ्या घटनेचा खुलासा