तब्बल २ वर्षांनी युकी भांब्री एटीपी क्रमवारीत पहिल्या १०० मध्ये

मुंबई | आज जाहीर झालेल्या जागतिक क्रमवारीत भारताचा युकी भांब्री तब्बत दोन वर्षांना पहिल्या १०० खेळाडूंमध्ये आला आहे. त्याला २२ स्थानांचा फायदा होऊन नविन क्रमवारीत तो ८३व्या स्थानी विराजमान झाला आहे. 

९ ते १५ एप्रिल २०१८ या काळात झालेल्या तैपेई ओपन जिंकल्यामूळे त्याचे एटीपी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. २०१६ नंतर तो प्रथमच जागतिक क्रमवारीत पहिल्या १०० खेळाडंमध्ये आला. 

भारतीय खेळाडूची एकेरीतील ही २०११ नंतरची सर्वोत्तम क्रमवारी आहे. जूलै २०११ मध्ये सोमदेव देववर्मन एटीपी क्रमवारीत ६२व्या स्थानी गेला होता. 

युकीने २०१५मध्ये जागतिक क्रमवारीत पहिल्या १०० मध्ये प्रवेश केला होता परंतू दुखापतीमूळे त्याला पुढे हे स्थान टिकवता आले नाही. तो फेब्रुवारी २०१६मध्ये एटीपी क्रमवारीतील टाॅप १०० मधून बाहेर गेला होता. 

जर युकी येत्या काळात पहिल्या १०० मध्ये राहिला तर त्याला पात्रता फेरी न खेळताही ग्रॅंड स्लॅम किंवा एटीपी मास्टर्स स्पर्धांमध्ये भाग घेता येणार आहे. 

रामकुमारही वैयक्तिक सर्वोच्च स्थानावर-

भारताचा आणखी एक स्टार खेळाडू रामकुमार रामनाथन हा एटीपी क्रमवारीत ११६ व्या स्थानी आला आहे.  तैपेई ओपनमध्ये तो युकीकडूनच अंतिम सामन्यात पराभूत झाला होता. याच कामगिरीचा त्याला फायदा होऊन १७ स्थानांचा फायदा झाला. 

अन्य खेळाडूंमध्ये-

सुमित नागल हा आज जाहिर झालेल्या क्रमवारीत २१५वा, प्रज्नेश गुन्नेस्वरण २६६वा तर अर्जून कढे ३९४व्या स्थानावर होता.