कसोटी पदार्पणातच शतक करत पृथ्वी शाॅचा विक्रमांचा विक्रम

राजकोट | भारत विरुद्ध विंडीज पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी युवा प्रतिभावान खेळाडू पृथ्वी शाॅने शानदार शतकी खेळी केली. ९९ चेंडूंचा सामना करताना त्याने नाबाद १०० धावा केल्या.

याबरोबर कसोटी पदार्पणात शतक करणारा तो जगातील १०६वा खेळाडू ठरला.तसेच भारताकडून अशी कामगिरी केवळ १४ खेळाडूंनी केली आहे.

भारताकडून कसोटी पदार्पणात लाला अमरनाथ, दिपक सोधन, क्रिपाल सिंग, अब्बास अली बेग, हनुमंत सिंग, गुंडप्पा विश्वनाथ, सुरिंदर अमरनाथ, मोहम्मद अझरुद्दीन, प्रविण आम्रे, सौरव गांगुली, वीरेद्र सेहवाग, सुरेश रैना, शिखर धवन आणि रोहीत शर्मा या खेळाडूंनी शतकी खेळी केली आहे.

मे महिन्यात कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणात शेवटची शतकी खेळी पहायला मिळाली होती. तेव्हा केविन ओब्रायनने पाकिस्तान विरुद्ध ११८ धावा केल्या होत्या.

याबरोबर केलेले काही विक्रम-

पदार्पणात शतकी खेळी करताना १०० पेक्षा कमी चेंडू खेळणारा तो जगातील केवळ तिसरा फलंदाज बनला आहे. यापुर्वी शिखर धवन (८५) आणि ड्वेन स्मिथ (९३) यांनीच १०६ खेळाडूंमध्ये अशी कामगिरी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-