रॉस टेलरकडून सचिनएवढीच न्यूझीलँड देशासाठी मोठी कामगिरी

हॅमिल्टन । न्यूझीलँड विरुद्ध विंडीज दुसऱ्या कसोटीत रॉस टेलरने कसोटी कारकिर्दीतील १७वे शतक करत मोठा विक्रम केला आहे. तो न्यूझीलँडकडून कसोटीत सर्वाधिक शतके करणारा खेळाडू बनला आहे.

न्यूझीलँडकडून सर्वाधिक कसोटी शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो आता मार्टिन क्रो, केन विल्यमसनबरोबर संयुक्तपाने अव्वल स्थानी आहे. रॉस टेलरने ८३ कसोटी सामन्यात १४९ डावात ४७.३३ च्या सरासरीने ६२४७ धावा केल्या आहेत. त्यात त्याच्या १७ शतकांचा आणि २८ अर्धशतकांचा समावेश आहे.

आता वनडे आणि कसोटीत न्यूझीलँडकडून सर्वाधिक शतके करणारा तो खेळाडू बनला आहे. हा विक्रम मोडल्यानंतर रॉस टेलर भावनिक झाला होता. आपला गुरु आणि मेंटॉर मार्टिन क्रोच घराच्या मैदानावर रेकॉर्ड मोडल्यामुळे त्याने आनंद व्यक्त करताना आपल्या भावनांना मार्ग मोकळा करून दिला.

न्यूझीलँडकडून सर्वाधिक कसोटी शतके करणारे खेळाडू
१७ मार्टिन क्रो
१७ केन विल्यमसन
१७ रॉस टेलर
१२ ब्रेंडन मॅक्क्युलम
१२ जॉन राइट