हाशिम अमलाने मोडला ग्रॅम स्मिथचा मोठा विक्रम

0 172

दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज हाशिम अमलाने आज बांगलादेशविरुद्ध खेळताना नाबाद १०४ धावांची खेळी केली. याबरोबर त्याने कसोटीत २८व्या शतकाची नोंद केली.

ही शतकी करताना त्याने दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅम स्मिथचा २७ शतकांचा विक्रम मोडला. सध्या १०९ सामन्यात अमलाच्या नावावर २८ कसोटी शतके आहेत. स्मिथने ११७ कसोटी सामन्यात २७ अर्धशतके केली होती.

ही शतकी खेळी करताना त्याने १२७ चेंडूत १०४ नाबाद धावा केल्या आहेत. यात १४ चौकारांचा समावेश आहे.

सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो आता १५व्या स्थानी आला असून आफ्रिकेकडून २ऱ्या स्थानावर आहे.

Comments
Loading...
%d bloggers like this: