टाॅप ५- या संघाने खेळले आहेत सर्वाधिक कसोटी सामने!

बंगळूरू। भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात गुरुवार, 14 जूनपासुन कसोटी सामना सुरु झाला आहे. हा सामना अफगाणिस्तानचा पहिलाच कसोटी सामना आहे.

अफगाणिस्तानला आयसीसीच्या पूर्ण सदस्यत्वाचा मान 2017 मध्ये मिळाला. त्यामुळे अफगाणिस्तान कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा आत्तापर्यंतचा एकुण 12 वा संघ ठरला आहे.

आत्तापर्यंत क्रिकेटमध्ये सर्वाधिक कसोटी सामने इंग्लंडने खेळले आहेत. त्यांनी आत्तापर्यंत 999 कसोटी सामने खेळले आहेत. यामुळे त्यांना 1000 कसोटी खेळणारा पहिला संघ होण्याची संधी आहे.

ते 1 आॅगस्टपासून भारताविरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत त्यांचा 1000 वा सामना खेळतील.

त्यांच्या पाठोपाठ आॅस्ट्रेलियाने 812 सामने खेळले आहेत. तसेच सर्वात कमी सामने आयरलँडने खेळले आहे. आयरलँडने याच वर्षी 11 मेला पहिला कसोटी सामना खेळला. त्यांनी आत्तापर्यंत हा एकमेव कसोटी सामना खेळला आहे.

या खेळाडूंनी खेळले आहेत कसोटी सामने:

999 सामने – इंग्लंड 

812 सामने – ऑस्ट्रेलिया

531 सामने – वेस्ट इंडीज 

522 सामने – भारत*

426 सामने – न्यूझीलंड 

425 सामने – दक्षिण आफ्रिका 

415 सामने – पाकिस्तान 

270 सामने – श्रीलंका

106 सामने – बांगलादेश 

105 सामने – झिम्बाब्वे  

1 सामना – आयरर्लंड  

1 सामना – अफगाणिस्तान  (पदार्पण) *

महत्त्वाच्या बातम्या:

ना सचिन, ना कपिल, ना धोनी… अशी कामगिरी केली आहे फक्त अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी

सलामीविर मुरली विजयचे शानदार शतक

टाॅप ३- या भारतीय ओपनरने केली आहेत कसोटीत सर्वाधिक शतके