साई प्रणीतने जिंकली इंडोनशियन ओपन ग्रँड प्रिक्स स्पर्धा

0 86

भारतीय बॅडमिंटन स्टार साई प्रणीतने इंडोनेशियन खेळाडू जोनाथन ख्रिस्तीला हरवून इंडोनशियन ओपन ग्रँड प्रिक्स स्पर्धा जिंकली.तीन सेट चाललेल्या रोमहर्षक सामन्यात इंडोनेशियन खेळाडूने पहिल्या सेटमध्ये पहिल्यापासून बढत घेतली होती.पहिला सेट इंडोनेशियन खेळाडूने२१-११ असा जिंकला.

अंतिम सामन्यात टिकून रहायचे असेन तर दुसरा सेट साईला जिंकने गरजेचे होते,त्यामु़ळे साईने सुरुवात चांगली केली आणि ९-३ अशी बढत घेतली असताना ख्रिस्तीने सलग सहा गुण घेत बरोबरी साधली. त्यानंतर साईने चांगला खेळ दुसरा सेट २१-१८ असा जिंकला.

सामन्याचा निकाल तिसऱ्या सेटमध्ये होणार होता. तिसऱ्या सेटमध्ये ३-८ ने मागे असताना साईने खेळ उंचावला. शेवटी १९-१९ अशा स्थितीत सेटअसतं सामना जिंकण्याची संधी दोंन्ही खेळाडूंना सारखीच होती पण साईने अनुभवाचा फायदा घेत सेट आपल्या नावे केला आणि अंतिम सामना जिंकत चषकाचवर नाव कोरले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयाबद्दल साई प्रणीतचे कौतुक केले.

Comments
Loading...
%d bloggers like this: