थायलंड रॅली मालिका 2017मध्ये सुधारीत कारमुळे संजय टकले आशावादी

पुणे | पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले शनिवारी-रविवारी थायलंड रॅली मालिकेतील चौथ्या फेरीत सहभागी होत आहे. मागील वर्ष तसेच यंदा पहिल्या फेरीच्या तुलनेत कारच्या तांत्रिक सज्जतेमध्ये सुधारणा झाली आहे. त्यामुळे चांगली कामगिरी नोंदविण्याच्या संजयच्या आशा उंचावल्या आहेत.

 या मालिकेतील ही चौथी फेरी आहे. संजयने दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत भाग घेतला नव्हता. आशिया करंडक मालिकेतील फेऱ्यांच्या तारखा तसेच आर5 कारसह सराव करायचा असल्यामुळे तो या रॅलींमध्ये भाग घेऊ शकला नाही. पहिली फेरी त्याच्यासाठी संमिश्र ठरली. अवघे दोन किलोमीटर बाकी असताना इसुझू डीमॅक्स युटीलीटी कार इंजिन टर्बो बंद पडून त्याची संधी हुकली.

 टीम इसुझू फुकेटने यावेळी कारवर बरीच मेहनत घेतली आहे. विचाई वात्ताहाविशुथ हे या संघाचे प्रमुख आहेतते ट्यूनर सुद्धा आहेतगेल्या वर्षी कार तांत्रिकदृष्ट्या सुसज्ज नव्हतीत्यानंतर या संघाने बरेच प्रयत्न केलेआशियाई क्रॉसकंट्री रॅली तसेच डकार रॅलीच्या तयारीसाठी संजयने या संघाला प्राधान् दिले आहेतो पुढील महिन्यात आशियाई क्रॉसकंट्रीत सहभागी होणार आहेत्यामुळे त्याला या मालिकेत खास प्रवेश देण्यात आला हे.

 संजयने यंदा एम्पार्ट संघाच्या साथीत मित्सुबिशी मिराज आर5 कार खरेदीत केली आहे. सुबारु इम्प्रेझा कारच्या तुलनेत ती जास्त शक्तीशाली आणि वेगवान आहे. या कारचा अनुभव संजयसाठी मोलाचा ठरेल.

संजयने सांगितले की, मिनील थान्याफात हा थायलंडचाच नॅव्हीगेटर माझ्या जोडीला असेल. पहिल्या फेरीत त्याचे इंग्रजी उच्चार समजणे थोडे कठिण गेले होते. यावेळी आम्हाला एकमेकांच्या शैलीचा आणि कार्यपद्धतीचा अंदाज आला आहे. त्याचा फायदा होईल.