ऑस्ट्रेलिया, इंग्लंड नाही तर थायलंडच्या महिला क्रिकेट संघाने केला हा मोठा विश्वविक्रम

शनिवारी(10 ऑगस्ट) थायलंड महिला संघाने नेदरलँड्समध्ये सुरु असलेल्या चौरंगी टी20 मालिकेत 5 व्या सामन्यात यजमान नेदरलँड्स विरुद्ध 8 विकेट्सने विजय मिळवला. याबरोबरच थायलंडने खास विश्वविक्रम रचला आहे.

थायलंड महिला संघाचा आंतरराष्ट्रीय टी20मधील हा सलग 17 वा विजय होता. थायलंडने जूलै 2018 पासून आत्तापर्यंत 17 सलग विजय मिळवले आहेत. त्यामुळे त्यांनी महिलांच्या आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक सलग विजय मिळवण्याचा विश्वविक्रम केला आहे.

त्यांनी हा विश्वविक्रम करताना ऑस्ट्रेलिया महिला संघाने मार्च 2014 ते ऑगस्ट 2015 दरम्यान केलेला सलग 16 टी20 विजयांचा विक्रम मागे टाकला आहे.

महिलांच्या आंतरराष्ट्रीय टी20मध्ये आत्तापर्यंत थायलंड आणि ऑस्ट्रेलिया व्यतिरिक्त इंग्लंड, झिम्बाब्वे आणि न्यूझीलंडला 10 किंवा त्यापेक्षा अधिक सलग विजय मिळवता आले आहेत. इग्लंड आणि झिम्बाब्वेने प्रत्येकी सलग 14 विजय मिळवले आहेत. तर न्यूझीलंडने 12 विजय मिळवले आहे.

विशेष म्हणजे झिम्बाब्वेची जानेवारी 2019 पासून सुरु झालेली ही विजयी घौडदौड अजून सुरु असून त्यांना थांयलंडच्या सलग 17 विजयांना मागे टाकण्याची संधी आहे.

थायलंडने शनिवारी नेदरलँड्सला 17.5 षटकात 54 धावांवर सर्वबाद केले होते. त्यानंतर थायलंडच्या महिलांनी 2 विकेट गमावत 8 षटकातच 55 धावांचे लक्ष्य पार केले होते.

आंतरराष्ट्रीय महिला टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सलग विजय मिळवणारे संघ – 

17 विजय* – थायलंड

16 विजय – ऑस्ट्रेलिया

14 विजय*- झिम्बाब्वे

14 विजय – इंग्लंड

12 विजय – न्यूझीलंड

12 विजय – ऑस्ट्रेलिया

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

रिषभ पंत, कुलदीप यादव करत आहेत अशा अनोख्या प्रकारे सराव, पहा व्हिडिओ

आज मैदानात उतरताच ‘यूनिवर्स बॉस’ ख्रिस गेलच्या नावावर होणार हा मोठा विक्रम

भारत-वेस्ट इंडीज संघात आज होणाऱ्या दुसऱ्या वनडे सामन्याबद्दल सर्वकाही…