नाशिक येथे होणाऱ्या राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेसाठी ठाणे जिल्हाचे दोन्ही संघ जाहीर

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने नाशिक जिल्हा परिषद व सह्याद्री युवा मंच, सिन्नर संस्था सौजन्याने ६६ वी वरिष्ठ गट पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा दि. ३१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०१८ या कालावधी मध्ये आडवा फाटा मैदान सिन्नर, नाशिक येथे होणार आहे.

नाशिक येथे होणाऱ्या या ६६ व्या राज्यस्तरीय वरिष्ठ गट पुरुष व महिला अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनने आपला पुरूष व महिला संघ जाहीर केला आहे.

६५ व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत ठाणे जिल्हा पुरुष संघ उपांत्य फेरीत पोहचला होता, तर महिला संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहचला होता. सिन्नर येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचा संघ जाहीर केला असून संघ खालीलप्रमाणे असेल

पुरुष संघ: १) परेश म्हाञे, २) विकेश म्हाञे, ३) स्वपनिल पाटील, ४) अभिजित भोईर, ५) विजय चव्हाण, ६) गणेश जाधव, ७) आशिष शिंदे, ८) सुरज दोदळे, ९) राकेश पाटील, १०) प्रशांत जाधव, ११) अनिकेत कुलकर्णी, १२) जिगर पाटील
संघ प्रशिक्षक – किरण मांजे
संघ व्यवस्थापक – प्रविण दळवी

महिला संघ: १) श्वेता राणे, २) अर्चना करडे, ३) हर्षला मोरे, ४) यादिका जोशी केळकर, ५) सायली परुळेकर, ६) चैताली बोराडे, ७) मनिषा चिकणे शिंदे, ८) उर्मिला देवडेकर ९) निकीता म्हाञे कदम, १०) प्रणाली मोरे, ११) मेघन खेडेकर, १२) दिव्या जाधव
संघ प्रशिक्षक – मंदार तावडे
संघ व्यवस्थापक – वनिता दळवी