‘#thankyouchef’ आजी माजी खेळाडूंनी अॅलिस्टर कूकच्या निवृत्तीनंतर व्यक्त केल्या भावना

इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू अॅलिस्टर कूकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. तो सध्या सुरु असलेल्या इंग्लंड विरुद्ध भारत संघातील कसोटी मालिकेनंतर निवृत्त होणार आहे.

म्हणजेच 7 सप्टेंबरपासून सुरु होणारा इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पाचवा कसोटी सामना हा कूकचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे.

त्याच्या या निवृत्तीनंतर क्रिकेटमधील अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यासाठी अनेकांनी #thankyouchef असा हॅशटॅग वापरुन कूकला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

कूकने 1-5 मार्च 2006 दरम्यान नागपूर येथे झालेल्या भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. तो इंग्लंडचा कसोटीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.

त्याने 160 कसोटी सामन्यात 44.88 च्या सरासरीने 12,254 धावा केल्या आहेत. यात त्याने 32 शतके आणि 56 अर्धशतके केली आहेत. तसेच तो 158 सलग कसोटी सामने ही खेळला आहे. त्यामुळे सर्वाधिक सलग कसोटी सामने खेळण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.

तसेच तो शेवटचा वनडे सामना डिसेंबर 2014 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला आहे. वनडेमध्ये त्याने 92 सामन्यात 3204 धावा केल्या आहेत. याबरोबरच तो 4 टी20 सामने खेळला असून त्यात त्याने 61 धावा केल्या आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.