मी विराटचा आभारी आहे : मश्रफी मुर्तझा

0 73

बांगलादेश संघाचा कर्णधारमश्रफी मुर्तझाने विराट कोहलीचे आभार मानले आहेत. विराट कोहलीने बांगलादेश संघाला ‘डेंजरस’ संघ असं संबोधित केल्याबद्दल मश्रफीने हे आभार मानलं आहे.

भारत विरुद्ध बांगलादेश हा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील उपांत्य फेरीचा सामना उद्या अर्थात १५ जून रोजी होत आहे. या सामन्याच्या पूर्वसंधेला आयोजित पत्रकार परिषदेत बांगलादेश संघाचा या कर्णधाराने पत्रकारांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. बांगलादेश संघाच्या कमजोर बाजू तसेच मजबूत बाजूंवर त्याने भाष्य केलं.

एका पत्रकाराने विराट कोहली तुझ्या संघाला ‘डेंजरस टीम’ असं संबोधित केल्याचं आणि अशी कोणती ‘डेंजरस’ गोष्ट तुमच्या संघात आहे असं विचारल्यावर  मश्रफी मुर्तझाने पहिले विराटाचे आभार मानले.

मश्रफी मुर्तझा याबद्दल म्हणाला. “मी विराटचा आभारी आहे की त्याला आमच्या टीम बद्दल असं वाटलं. प्रामाणीकपणे सांगायचं तर आम्ही कधी कधी अशी कामगिरी नक्की करतो. आम्ही सदैव स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो. ”

“आम्ही सर्व सामन्यात चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही जास्त निकालाचा विचार करत नाही. ”

आणखी एका प्रश्नावर उत्तर देताना मुर्तझा म्हणाला, ” आम्ही प्रथमच उपांत्यफेरीत खेळत आहे. आमच्यापेक्षा भारतावर जास्त दबाव आहे. भारताची लोकसंख्या जास्त आहे. भारतात लोक क्रिकेटवर खूप प्रेम करतात.  दोन्ही संघांकडून सारखीच अपेक्षा चाहते ठेवून आहेत. त्यामुळे आम्ही चांगला प्रयत्न करणार आहोत. ”

Comments
Loading...
%d bloggers like this: