मोठी बातमी: नदाल-फेडरर पुन्हा आमने सामने 

शांघाय । येथे सुरु असलेल्या एटीपी मास्टर्स स्पर्धेत राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवत अंतिम फेरी गाठली आहे. 

उपांत्यफेरीत रॉजर फेडररने डेल पोट्रोचा २-६, ६-३, ६-३ असा पराभव केला. फेडरर पहिला सेट पराभूत झाल्यावरही त्याने जबदस्त वापसी करत सामना जिंकला. 

पहिल्या उपांत्यफेरीत स्पेनच्या राफेल नदालने मारिन चिलीचला पराभवाचा धक्का दिला. मरिन चिलीचला या स्पर्धेत चौथे मानांकन होते. हा सामना २ तास ११ मिनिट चालला. या सामन्यात दोन्हीही सेटमध्ये चिलीचने नदालला चांगली झुंज दिली. परंतु अनुभवाच्या जोरावर नदालने सरशी केली.

नदाल यावर्षी १०व्यांदा अंतिम फेरीत पोहचला आहे. नदालचा हा कारकिर्दीतला ८७१ वा विजय होता. 

फेडररने यावर्षी नदालला ३ पैकी ३ सामन्यात पराभूत केले आहे तर नदाल सलग १६ सामने यावर्षी जिंकला आहे. फेडरर आणि नदाल आजपर्यँत ३८ वेळा आमने सामने आले असून त्यात नदालने २३ तर फेडररने १४ विजय मिळवले आहेत.