हे लोक म्हणतात विराट अनुष्काने आमच्या देशात लग्न करावे !

सध्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाबद्दल अनेक चर्चांना उधाण आले आहे. नुकतेच हे दोघे इटलीत लग्न करणार असल्याचे वृत्त आले आहे.

त्यात आता ऍडलेड ओव्हल स्टेडियमचे सीईओ अँड्रयू डॅनिअल हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहेत की ” आम्हाला विराट आणि अनुष्काचे लग्न ऍडलेड ओव्हल स्टेडियमवर आयोजित करायला आवडेल. हे विराटसाठी खूप छान असेल. विराटचा या स्टेडियमवरील इतिहास पाहता तो आणखी चांगल्या आठवणी येथे बनवू शकेल.”

डॅनिअल पुढे असेही म्हणाले की विराट अनुष्कासाठी हा अविस्मरणीय दिवस असेल.

विराटने त्याचे पहिले कसोटी शतक याच ऍडलेड ओव्हल स्टेडियमवर साजरे केले होते. त्याचबरोबर त्याने या मैदानावर तीन आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत. तसेच त्याने त्याची टी २० तील सर्वोच्च धावसंख्या असलेली नाबाद ९० धावांची खेळीही याच मैदानावर केली होती.

विराट कालच जाहीर झालेल्या आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.