डीआरएस पद्धतीचा जन्म ते तिचा प्रवास

१९९२ बेन्सन आणि हेगेस विश्वचषकात पहिल्यादा क्रिकेट खेळताना खेळाडूंनी रंगीत कपड्याचा वापर केला होता. तसेच पहिल्यांदाच वनडे क्रिकेटमध्ये पांढरा चेंडू वापरण्यात आला होता. या विश्वचषकातच पहिल्यांदा डे नाइट सामने खेळवण्यात आले होते. तेव्हा पासून आयसीसीने नेहमीच वनडे क्रिकेटच्या नियमांमध्ये बद्दल केले आहेत. चला तर मग पाहुयात काय आहेत हे बद्दल !

नवीन तंत्रज्ञानामुळे झालेले नियमांमधील बद्दल

क्रिकेटमधील वाढत्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे क्रिकेट जगात मोठे बद्दल झाले आहेत. क्रिकेट खेळण्याची आणि बघण्याची पद्धतच बदलून गेली आहे. मोठ्या स्क्रिन पासून ते स्पायडरकॅमपर्यंतच्या सर्व तंत्रज्ञानाने क्रिकेट विश्व् बदलून गेले आहे.

उदाहरणार्थ, ११९० ते २००० च्या दशकाच्या पूर्वार्धात, तिसऱ्या पंचांचा निर्णय लाल किंवा हिरव्या रंगाच्या प्रकाशाने संप्रेषित केला जात होता परंतु आता ‘OUT’ किंवा ‘NOT OUT’ शब्दाद्वारे मोठ्या स्क्रीनवर प्रदर्शित केले जात आहे.

तसेच तंत्रज्ञानामुळे पंचांचे जीवन अधिक सोपे झाले आहे आणि निर्णयक्षमता अधिक अचूक बनली आहे. सर्वोत्तम उदाहरण म्हणजे डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम किंवा डीआरएस आहे जे २०११ मध्ये प्रथम एकदिवसीय क्रिकेटमध्ये वापरण्यात आले होते.

प्रथम हे वापरणे अनिवार्य होते पण नंतर ते पर्यायी करण्यात आले त्याचा अर्थ असा की द्विपक्षीय मालिकेत डिअरएस तेव्हाच वापरला जाऊ शकतो जेव्हा दोन्ही संघ त्याचा वापर करण्यास सहमत असतील. डीआरएसचे विविध घटकांपैकी एक बॉल-टॅकिंग आहे जे एलबीडब्ल्यू निर्णयांसाठी वापरले जाते जे की खूप विवादात्मक ठरले आहे.

बॉल-टॅकिंग आणि हॉक आय सारखे तंत्रज्ञाना अपुरे आहे असे बीसीसीआयचे मत आहे. त्यामुळे बीसीसीआय भारताच्या मालिकेत डिअरएस वापरण्यास नकार आहे.
सध्या, प्रत्येक एकदिवसीय सामन्यात प्रत्येक संघासाठी एक रिव्हिव उपलब्ध असतो, जो की प्रत्येक यशस्वी आव्हानासाठी परत मिळवितो.