थोड्याच वेळात T20 मुंबई लीग लिलावाला सुरूवात, लाईव्ह पाहण्यासाठी…

आज दूपारी २ वाजता T20 मुंबई लीग लिलावाला सुरूवात होणार आहे. हे लिलाव T20 Mumbai च्या फेसबुक पेजवर चाहत्यांना लाईव्ह पाहता येणार आहेत. 

ह्या स्पर्धेत एकूण ६ संघ सहभागी होणार असून यापुर्वीच संघ मालकांची नावे घोषीत करण्यात आली आहे. 

ही लीग ११ मार्च ते २१ मार्च दरम्यान वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर लगेचच पंधरा दिवसांच्या अंतराने आयपीएललाही सुरुवात होणार आहे.

काल या स्पर्धेतील संघमालकांच्या नावांची घोषणा करण्यात आली. 

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर या स्पर्धेचा ब्रॅन्ड अॅंबेसिडर आहे. 

या स्पर्धेत भाग घेणारे संघ:

Mumbai North
Mumbai North-West
Mumbai North-East
Mumbai North-Central
Mumbai South-Central
Mumbai South