चेन्नई सुपर किंग्सवरील बंदी उठवली, धोनीला संघात परत घेण्यासाठी संघव्यवस्थापन उत्सुक

आज चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स संघांवरील बंदी उठवण्यात आली आहे. चेन्नई सुपर किंग्स संघव्यवस्थापन २०१५ मधील जास्तीत जास्त खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला परत घेण्यासाठी इच्छूक असल्याचं बोललं जात आहे.

चेन्नई संघावरील बंदी अधिकृतपणे उठवली गेली आहे. बंदीचा कालावधी आज संपला असल्याचं ट्विट चेन्नईच्या ट्विटर अकाउंट वरून करण्यात आलं आहे.
“सुपर मॉर्निंग, लायन्स, आता आपली प्रतीक्षा संपली आहे. वेळ आली आहे पुन्हा उभे राहायची आणि चमकण्याची! #CSKReturns #whistlepodu” असा ट्विट आज सकाळी चेन्नईच्या अधिकृत अकाउंटवरून करण्यात आला आहे.