- Advertisement -

हैप्पी ब्रदर्स डे: जगातील प्रसिद्ध भाऊ जे खेळले एकत्र क्रिकेट

0 85

आज २४ मे म्हणजेच ब्रदर्स डे. तसे तर देशासाठी खेळताना प्रत्येक संघातील प्रत्येक खेळाडूमध्ये आपल्या सहकारी खेळाडूसाठी बंधू प्रेम येतेच आणि क्रिकेट रसिक तर काही वर्षांनी क्रिकेटपट्टूचे नवे अशी जोडतात जसे की ते खरोखरच बंधू आहेत. जसे की सचिन-गांगुली, द्रविड-लक्ष्मण,सेहवाग-गंभीर, जयवर्धने-संगकारा, गिलख्रिस्ट-हेडन. ब्रदर्स डेच्या निम्मिताने आज आपण पाहणार आहोत जगभरातील असे क्रिकेटर्स बंधू ज्यांनी एकत्र खेळून देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.

१. स्टिव्ह आणि मार्क वॉ ( ऑस्ट्रेलीया )

स्टिव्ह उजव्या हाताचा उत्कृष्ट फलंदाज तर मार्क डाव्या हाताचा स्वतःची वेगळी शैली असलेला धडाकेबाज फलंदाज. विशेष म्हणजेच हे दोघेही जुळे भाऊ होते. स्टिव्हने विसाव्या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या संघात स्थान मिळवले. तर मार्कने पदार्पणातच १३८ धावांची खेळी केली. स्टिव्हच्या नेतृत्वखाली ऑस्ट्रेलियाने १९९९ चा विश्वचषक जिंकला.

Steve Waugh Mark Waugh - हैप्पी ब्रदर्स डे: जगातील प्रसिद्ध भाऊ जे खेळले एकत्र क्रिकेट

२. अँडी आणि ग्रॅण्ट फ्लॉवर ( झिम्बोंबे )

अँडी आणि ग्रॅण्ट या दोघा भावांनी भारत विरुद्ध १९९२ मध्ये हरारे येथे पदार्पण केले. अँडी हा ग्रॅण्ट पेक्षा तीन वर्षाने लहान होता. ग्रॅण्ट आणि अँडी या दोन्ही बंधूनी मिळून झिम्बॉब्बे क्रिकेटला एका नव्या उंचीवर नेले होते. या दोघाच्या निवृत्तीनंतर झिम्बॉबेला कधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगला खेळ करता आला नाही.

cl andy - हैप्पी ब्रदर्स डे: जगातील प्रसिद्ध भाऊ जे खेळले एकत्र क्रिकेट

 

३. माईक आणि डेविड हसी ( ऑस्ट्रेलिया )

मिस्टर क्रिकेट म्हणून ओळखला जाणारा आणि आपल्या सरळ पण फायदेशीर फडकेबाजीसाठी चर्चेत असलेला माईक हा १६६ दिवसातच कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावा करणारा खेळाडू बनला. माईक प्रमाणेच डेव्हिडला ही आंतररराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळायला खूप वाट बघावी लागली. माईक डावखुरा तर डेविड उजव्या हाताचा फलंदाज आहे.

AustraliavSriLankaTriSeriesFinalGamejBkDbdAENqsx - हैप्पी ब्रदर्स डे: जगातील प्रसिद्ध भाऊ जे खेळले एकत्र क्रिकेट

४. ब्रॅंडन आणि नॅथन मॅककल्लूम ( न्यूझीलंड )
पॉवर हिटर म्हणून बहुचर्चित असलेला आणि न्यूझीलंडला स्वतःच्या नेतृत्व खाली २०१५च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत नेणारा ब्रॅंडन हा दोन्ही बंधूंमधील जास्त यशस्वी आणि जास्त काळ न्यूझीलंडकडून खेळणारा क्रिकेटपटू आहे. नॅथन हा ब्रॅंडनचा मोठा भाऊ आहे. फिरकी गोलंदाज म्हणून २००७ च्या टी २० विश्वचषकासाठी त्याला संघात स्थान दिले गेले होते.

Screenshot 1 10 - हैप्पी ब्रदर्स डे: जगातील प्रसिद्ध भाऊ जे खेळले एकत्र क्रिकेट

५. एलबी आणि मोर्ने मॉर्केल ( दक्षिण आफ्रिका )

एलबी हा लान्स कुल्स्नर सारखीच प्रतिभा असलेला खेळाडू मानला जात होता. तर मोर्ने हा शॉन पोलाक आणि मखाया नतीनी यांची गादी चालवणारा गोलंदाज वाटत होता. मोर्ने मॉर्केलला आपली प्रतिभा दाखवता आली. पण एलबीला ते काही जमले नाही. मोर्ने मॉर्केल या दोनी भावांमध्ये जास्त यशस्वी ठरला.

e6a671aa3be36c863d03d7bfd0a30af5 - हैप्पी ब्रदर्स डे: जगातील प्रसिद्ध भाऊ जे खेळले एकत्र क्रिकेट
६. उमर आणि कामरान आकमल ( पाकिस्तान )

कामरान अकमला याला मोईन खानच्या जागी पाकिस्तान संघात घेण्यात आले होते. यष्टीरक्षक आणि सलामीला धडाकेबाज फलंदाज यामुळे तो पाकिस्तानमध्ये थोड्याच दिवसात खूप प्रसिद्ध झाला. पण त्यानंतर त्याच्या विकेटकिपिंगमध्ये कमालीचा फरक पडला आणि त्याने आपली संघातील जागा गमावली.विशेष म्हणजे कामरानच्या जागी संघात स्थान हे त्याच्या भावाला देण्यात आले. उमर आकमल त्याच्यापेक्षा चांगला फलंदाज आहे म्हणून ही संधी देण्यात आली परंतु भावाप्रमाणेच त्याचीही विकेटकिपिंग सुमार होती.

5524f8ee0608e - हैप्पी ब्रदर्स डे: जगातील प्रसिद्ध भाऊ जे खेळले एकत्र क्रिकेट

७. इरफान आणि युसूफ पठाण ( भारत )

प्रथम गोलंदाज आणि नंतर अष्टपैलू खेळाडू म्हणून भारतीय संघात इरफानने युसूफच्याआधी स्थान मिळवले. इरफानचा मोठा भाऊ युसूफला भारतकडून टी२० विश्वचषकाच्याअंतिम सामन्यात खेळण्याची संधी मिळाली पण त्यात त्याला काही चमकदार कामगिरी करता आली नाही. पण त्यानंतर झालेल्या २००८च्या आयपीएलमध्ये राजस्थानकडून खेळताना त्याने काही अप्रतिम खेळ करून दाखवला. इरफान हा कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्याच षटकात हॅट्रिक घेणारा एकमेव खेळाडू आहे.

irfan 1450251217 800 - हैप्पी ब्रदर्स डे: जगातील प्रसिद्ध भाऊ जे खेळले एकत्र क्रिकेट

Comments
Loading...
%d bloggers like this: