जाणून घ्या किती लेख लिहिले गेले महिला क्रिकेट विश्वचषकावर !

या वर्षी इंग्लंडमध्ये झालेला महिला विश्वचषक अनेक कारणांनी खास ठरला. कधी नव्हे ते महिला क्रिकेटला एवढ्या मोठ्या प्रमाणावर चाहता वर्ग
मिळाला.

भारतीय महिला संघ तर पराभूत होऊनही चाहत्यांनी या संघातील खेळाडूंना भेटायला मोठी गर्दी केली. या सर्वात माध्यमांनी अतिशय मोठी जबाबदारी पार पडताना या स्पर्धेला मोठे व्यासपीठ मिळवून देण्याचे काम केले.

जवळजवळ १०० देशात ५०,००० पेक्षा जास्त बातम्या ह्या आयसीसी महिला विश्वचषक २०१७वर लिहिल्या गेल्या. या मुख्यकरून छापील किंवा प्रिंट मीडिया आणि ऑनलाईन मीडिया यांच्यावर प्रसिद्ध झाल्या.

या स्पर्धेबद्दल सर्वाधिक लेख हे भारतातून लिहिले गेले. त्यात यजमान इंग्लंडपेक्षा भारतातून तब्बल २००० लेख जास्त प्रसिद्ध झाले. भारतात १६,००० तर इंग्लंडमध्ये १४,००० बातम्या या स्पर्धेच्या झाल्या.

ऑस्ट्रेलिया देशातही या स्पर्धेची दखल घेण्यात आली. या देशातून तब्बल ९००० लेख प्रसिद्ध झाले. अमेरिकेत जरी क्रिकेट एवढे प्रसिद्ध नसले तरी या देशात ४७०० तर दक्षिण आफ्रिकेत १३६८ लेख या स्पर्धेवर प्रसिद्ध झाले.

महा स्पोर्ट्सने या स्पर्धेची विशेष दखल घेत सामन्यांच्या निकालाबरोबरच विविध आकडेवारी, स्पर्धेतील मनोरंजक घटना यांसारख्या गोष्टींवर ५०हुन अधिक लेख प्रसिद्ध केले.