जडेजाच्या अर्धशतकानंतर चाहत्यांनी केले असे जोरदार सेलिब्रेशन, पहा व्हि़डिओ

आज(25 मे) द ओव्हल मैदानावर भारताचा 2019 विश्वचषकातील पहिला सराव सामना न्यूझीलंड विरुद्ध सुरु आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 39.2 षटकात सर्वबाद 179 धावा करत न्यूझीलंड समोर विजयासाठी 50 षटकात 180 धावांचे आव्हान ठेवले आहे.

भारताकडून अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाने अर्धशतकी खेळी केली आहे. त्याने या सामन्यात 50 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकार मारत 54 धावांची खेळी केली. त्याचबरोबर त्याने 9 व्या विकेटसाठी कुलदीप यादव बरोबर 62 धावांची भागीदारीही केली.

तो जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा भारताची स्थिती 6 बाद 81 धावा अशी होती. पण त्याने भारताचा डाव सावरताना त्याचे अर्धशतकही पूर्ण केले. त्याने 38 व्या षटकात ट्रेंट बोल्टने टाकलेल्या चौथ्या चेंडूवर 2 धावा काढत 47 चेंडूत हे अर्धशतक पूर्ण केले. तसेच त्याने नेहमीप्रमाणे तलवारीसारखी त्याची बॅट फिरवत त्याच्या स्टाईलने हे अर्धशतक साजरे केले.

त्याच्या या अर्धशतकानंतर मैदानावर सामना पहायला आलेल्या चाहत्यांनीही जोरदार जल्लोष केला. याचा व्हिडिओ आयसीसी विश्वचषकाच्या ट्विटर हँडेलवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये दिसते की चाहते ढोल वाजवून जडेजाच्या अर्धशतकानंतर आनंद व्यक्त करत आहेत.

या व्हिडिओला कॅप्शन देताना लिहिले आहे की ‘भारताच्या रविंद्र जडेजाने तलवारीप्रमाणे बॅट फिरवत त्याच्या स्टाईलने अर्धशतक साजरे केले. चाहत्यांनीही त्याच्या या अमुल्य खेळीबद्दल त्याला प्रोत्साहन दिले आहे.’

या सामन्यात जडेजा व्यतिरिक्त अन्य भारतीय फलंदाजांना मात्र काही खास करता आले नाही. फक्त हार्दिकने 30 धावांची छोटेखानी खेळी केली. तसेच या दोघांव्यतिरिक्त फक्त विराट कोहली(18), एमएस धोनी(17) आणि कुलदीप यादव(19) यांनाच दोन आकडी धावसंख्या गाठता आली.

न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच जेम्स निशामने तीन तर टिम साऊथी, कॉलीन डि ग्रँडहोम आणि लॉकी फर्ग्यूसनने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या –

रविंद्र जडेजाचे न्यूझीलंड विरुद्ध शानदार अर्धशतक, अन्य फलंदाजांची कामगिरी मात्र सुमार

विश्वचषक २०१९: या कारणामुळे इंग्लंडच्या कर्णधाराला मुकावे लागले पहिल्या सराव सामन्याला

विजय शंकरच्या दुखापतीबद्दल असा आला रिपोर्ट, बीसीसीआयने दिली माहिती