आजचा दिवस होता मुंबईकरांचा, तीन क्रिकेटर्सचे तीन पराक्रम

ऑकलंड | भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या टी२० सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ७ विकेट्स आणि ७ चेंडू राखून शानदार विजय मिळवला. याचबरोबर भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

या सामन्यात कृणाल पंड्याला उत्कृष्ठ गोलंदाजीबद्दल सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. याच सामन्यात धावांचा पाठलाग करताना भारताकडून कर्णधार रोहित शर्माने  सर्वाधिक ५० धावांची खेळी केली.

आजचा दिवस मुंबईकरांचा-

या सामन्यात रोहित शर्माने टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा (२२८८), सर्वाधिक ५०+ धावा (२०वेळा), भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार (३४९) पराक्रम केला. रोहित आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार आहे.

दुसऱ्या बाजूला याच सामन्यात मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या कृणाल पंड्याने ४ षटकांत केवळ २८ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. तो न्यूझीलंडमध्ये टी२० डावात ३ विकेट्स घेणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. त्याच्या याच कामगिरीमुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

याचबरोबर मुंबई इंडियन्सच्याच बेन कटिंगने आज ब्रिस्बेन हिट्स विरुद्ध मेलबर्न स्टार्स यांच्यातील टी२० सामन्यात ३० चेंडूत नाबाद ८१ धावांची खेळी केली आहे. त्यात त्याने पहिल्या १८ चेंडूत ५० धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने १५८ धावांचा पाठलाग करताना ब्रिस्बेन हिट्सला केवळ १० षटकांत १० विकेट्सने विजय मिळवून दिला आहे.

विशेष म्हणजे कालच मुंबईकर वसिम जाफर ज्या संघाचा भाग आहे त्या विदर्भाने सलग दुसऱ्या वर्षी रणजी स्पर्धेचे विजेतेपद जिंकले तर याच संघाचे मुंबईकर चंद्रकांत पंडित हे प्रशिक्षक आहेत.

महत्त्वाची बातमी-

या ५ विक्रमांमुळे रोहित शर्माच आहे टी२०मध्ये विराटपेक्षा मोठा खेळाडू

तब्बल २०० सामने कमी खेळूनही रोहित धोनीला सरस

जी वेळ रोहित शर्माच्या टीम इंडियावर आली ती कधीही विराटच्या संघावर आली नव्हती

ना धोनी, ना विराट; रोहित शर्मा कर्णधार म्हणून सर्वांना सरस