विश्वचषकाच्या इतिहासात असे पहिल्यांदाच झाले…

आज(11 जून) 2019 विश्वचषकात 16 वा सामना बांगलादेश विरुद्ध श्रीलंका संघात ब्रिस्टॉलला होणार होता. मात्र हा सामना नाणेफेकही न होता पावसामुळे रद्द झाला आहे.

त्यामुळे विश्वचषकाच्या इतिहासात असे पहिल्यांदाच झाले आहे की एका विश्वचषक स्पर्धेत एकापेक्षा अधिक सामने एकही चेंडू न खेळता पावसामुळे रद्द झाले आहेत. आजच्या सामन्याआधी 7 जूनला पाकिस्तान विरुद्ध श्रीलंकेचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. या सामन्यातही नाणेफेक झाली नव्हती.

तसेच याआधीच्या 11 विश्वचषक स्पर्धांमध्ये फक्त 1979 च्या विश्वचषकात श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील सामना तर 2015 च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश संघातील सामना पावसामुळे एकही चेंडूचा खेळ न होता रद्द झाला होता.

त्याचबरोबर यावर्षीच्या विश्वचषकात सोमवारी दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिजचा सामनाही अनिर्णित राहिला आहे. या सामन्यात केवळ 7.3 षटकांचा खेळ झाला होता. त्यानंतर पावसाचा व्यत्यय आल्याने उर्वरित सामना पुर्ण होऊ शकला नव्हता.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विश्वचषक २०१९: पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाला बसला मोठा धक्का

या पाच खेळाडूंपैकी एकाला मिळू शकते शिखर धवन ऐवजी टीम इंडियात संधी

विश्वचषक २०१९: भारत-न्यूझीलंड सामना होऊ शकतो रद्द, जाणून घ्या कारण