चेन्नई सुपर किंग्सच्या बाबतीत चौथ्यांदाच घडली अशी गोष्ट

हैद्राबाद। आज आयपीएल 2019 मध्ये सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात सामना होणार आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीयमवर होणाऱ्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा नियमित कर्णधार एमएस धोनी खेळणार नसल्याने सुरेश रैना नेतृत्व करणार आहे.

धोनीने या सामन्यात विश्रांती घेतली आहे. त्यामुळे जवळ जवळ 9 वर्षांनंतर धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या सामन्याला मुकणार आहे. तसेच आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या अंतिम 11 जणांच्या संघात धोनी नसण्याची ही केवळ चौथी वेळ आहे.

याआधी मार्च 2010 मध्ये धोनी चेन्नई सुपर किंग्सच्या सलग तीन सामन्यांना मुकला होता. त्यामुळे तो चेन्नईकडून सलग 121 सामने खेळला आहे. पण आज धोनीने विश्रांती घेतल्याने यात खंड पडला आहे. त्यामुळे तो आयपीएलमध्ये एकाच संघाकडून सर्वाधिक सलग सामने खेळण्याच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आला आहे.

या यादीत सुरेश रैना, रोहित शर्मा आणि विराट कोहली अनुक्रमे पहिल्या तीन स्थानांवर आहेत. रैना चेन्नईकडून 134 सामने सलग खेळला आहे. तर रोहित 133 सामने मुंबई इंडियन्सकडून सलग खेळला आहे आणि विराट रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून 129 सामने सलग खेळला आहे.

धोनीसाठी आत्तापर्यंत आयपीएलचा 12 वा मोसम चांगला ठरला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईने आत्तापर्यंत या मोसमात 8 पैकी 7 सामने जिंकले आहेत. तसेच धोनीने 8 सामन्यात 2 अर्धशतकांसह 230 धावा केल्या आहेत.

धोनीला मागील दोन सामन्यांपासून पाठीच्या दुखापतीचा त्रास होत आहे, त्यामुळे त्याने विश्रांती घेतली असल्याची दाट शक्यता आहे.

रैनाने आजच्या सामन्यात नाणेफेकीवेळी सांगितले की धोनीने आज विश्रांती घेतली असून तो पुढच्या सामन्यात खेळेल. चेन्नईचा पुढील सामना 21 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध होणार आहे.

आजच्या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आत्तापर्यंत या आयपीएल सामन्यांना मुकला आहे धोनी – 

19 मार्च 2010 – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली डेअरडेविल्स (दिल्ली)

21 मार्च 2010 – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब (चेन्नई)

23 मार्च 2010 – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (बेंगलोर)

17 एप्रिल 2019 – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद (हैद्राबाद)

महत्त्वाच्या बातम्या –

विश्वचषकासाठी संघात जागा न मिळाल्याने या खेळाडूला आवरता आले नाही अश्रू, पहा व्हिडिओ

विश्वचषकासाठी संघात जागा न मिळालेल्या रायडू, पंतसाठी ही आहे आनंदाची बातमी

२०१९ विश्वचषकासाठी इंग्लंड संघाची घोषणा, जोफ्रा आर्चरला संधी नाही