हे सुंदर मैदान ठरणार आज भारतातील ५०वे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम !

तिरुवनंतपुरम । भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि निर्णायक सामना आज येथील द ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे. हे भारतातील ५०वे आंतरराष्ट्रीय मैदान ठरणार आहे जे क्रिकेटचा आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करणार आहे.

तिरुवनंतपुरम शहरात २५ जानेवारी १९८८ शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना झाला होता. विद्यापीठाच्या मैदानावर हा सामना जेव्हा झाला होता तेव्हा व्हिव्हियन रिचर्ड यांच्या संघाने भारताला येथे पराभूत करत मालिकेत ६–१ असा विजय मिळवला होता.

सध्याच्या भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री हे तेव्हा भारतीय संघाचे कर्णधार होते. त्यानंतर या शहरात कोणताही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना झाला नाही.

येथून केवळ २००किलोमीटर असणाऱ्या कोचीच्या मैदानावर मात्र भारतीय संघ आजपर्यंत ९ सामने खेळला आहे.

केरळ क्रिकेट असोशिएशनच्या संकेत स्थळावर ह्या मैदानाची मालकी केरळ विद्यापीठाकडेच आहे. याची क्षमता ५५००० प्रेक्षकांची असून २४० कोटी रुपये याला खर्च आला आहे.

छायाचित्र: