भारतीय संघाच्या आयर्लंड दौऱ्याची घोषणा

0 355

बीसीसीआयने आज भारतीय संघाच्या आयर्लंड दौऱ्याची घोषणा केली. या दौऱ्यात भारतीय संघ २ टी २० सामने खेळणार असून हे दोन्ही सामने अनुक्रमे २७ जून आणि २९ जूनला डब्लिन येथे होतील.

भारताचा हा आयर्लंड दौरा जुलै मध्ये होणाऱ्या इंग्लंड दौऱ्याच्या आधी होणार असल्याने त्याच्याकडे इंग्लंड दौऱ्याची तयारी म्हणूनही पहिले जात आहे.

याआधी भारतीय संघाने २००७ मध्ये आयर्लंड दौरा केला होता. ज्यात १ वनडे सामना झाला होता. या सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार भारतीय संघाने ९ विकेट्सने विजय मिळवला होता. त्याचबरोबर टी २० क्रिकेट प्रकारात भारत आणि आयर्लंड २००९ ला झालेल्या टी २० विश्वचषकात एकदाच आमने सामने आले आहेत.

असा असेल आयर्लंड दौरा:

२७ जून २०१८ – पहिली टी २० – डब्लिन
२९ जून २०१८ – दुसरी टी २० – डब्लिन

Comments
Loading...
%d bloggers like this: