६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी जम्मू काश्मीरच्या संघाची घोषणा

जम्मू। 65 व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी जम्मू-काश्मीरच्या महिला आणि पुरुष संघाची निवड पूर्ण झाली असून हे संघ हैद्राबादला रवाना झाल्याची माहिती जम्मू -काश्मीर आम्याचुर कबड्डी असोसियशने काल दिली.

65 वी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा ३१ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत हैद्राबाद येथील गाचीबोवली इनडोअर स्टेडियमवर होणार आहे.

जम्मूच्या पुरुष संघाचे नेतृत्व स्टार खेळाडू मोहिंदर सिंग करणार असून महिला संघाच्या नेतृत्वाची धुरा शीतल शर्मा सांभाळणार आहे.

जम्मू संघ स्पर्धेला रवाना होताना या संघावर बक्षिसांचा वर्षाव झाला. जम्मू येथील आमदार राजेश गुप्ता यांच्या हस्ते खेळाडूंना किट देण्यात आले. त्याचबरोबर राजेश गुप्ता यांनी कॉन्स्टिट्यूसी डेव्हलपमेंट फंड मधून कबड्डीच्या विकासासाठी 4 लाख रुपये देण्याची घोषणा केली.

पुरुष संघ- मोहिंदर सिंग (कर्णधार), अमन सिंग,मो.उसाद बिन यौसफ,जहांगीर अहमद दार,अमनदीप सिंग, बिशाद अली खान, केहाव सिंग, इफतखार अहमद, नासिर अहमद खान, परमवीर सिंग, मुकेश कुमार शर्मा, ललीत शर्मा.
अनिल शर्मा ( प्रशिक्षक),खुर्शीद अहमद ( व्यवस्थापक)

महिला संघ-शीतल शर्मा ( कर्णधार ), पूजा देवी, नितीसज बक्षी, काजल देवी, मिताली मनहास, चुणी देवी, आशु कौर, शहनाझ अख्तर, शेख इंशन युसूफ, मसरूफा मंजूर, वहिदा नबी, बिनी मलगोत्र.
अजय गुप्ता (प्रशिक्षक), अनुराधा (व्यवस्थापक).