विद्यानिकेतन शाळेने पटकावले पुण्यातील केबीडी जुनिअर्स स्पर्धेचे विजेतेपद

अंतिम सामन्यात ४७-३० अशा फरकाने केला बिशप्स स्कुलचा पराभव

पुणेरी पलटणचा स्टार खेळाडू संदीप नरवालने ट्रॉफी देऊन विजेत्यांना केले सन्मानित

शाळांमध्ये देखील कबड्डीचा प्रसार करण्याच्या हेतूने प्रो कबड्डी लीग तर्फे प्रत्येक शहरात कबड्डी जुनिअर्सचे आयोजन करण्यात येते.पुण्यातील केबीडी जुनिअर्स स्पर्धेचेविजेतेपद पुण्यातील विद्यानिकेतन शाळेने पटकावले.

अंतिम सामन्यात विद्यानिकेतन शाळेने बिशप्स स्कुलचा ४७-३० अशा फरकाने दणदणीत परब करून पुण्यातीलअजिंक्यपद मिळवले. बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

पुणेरी पलटणचा स्टार खेळाडू संदीपनरवालच्या उपस्थितीत अंतिम सामना पार पडला. संदीपच्या हस्ते विजेत्यांना चषक देऊन गौरवण्यात आले.

पुण्यातील ८ सर्वोत्तम शाळांच्या कबड्डी संघांमध्ये हे सामने पार पडले. लेक्सिकोन इंटरनॅशनल स्कुल, कल्याणी नगर, बिशप्स स्कुल, आर्मी पब्लिक स्कुल, लॉयलाहायस्कुल, एमइएस बॉयसस्कुल, डी वाय पाटील इंटरनॅशनल स्कुल , सेलम हायस्कुल, विद्यानिकेतन या शाळांमध्ये कबड्डीचे सामने पार पडले आणि त्यास मुलांच्यापालकांनी उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला.

डी वाय पाटील इंटरनॅशनल स्कुल आणि बिशप्स स्कुल तसेच विद्यानिकेतन आणि एमइएस बॉयस स्कुल दरम्यान उपांत्यफेरीचे सामने रंगले.

हैदराबाद, नागपूर, अहमदाबाद, लखनौ, मुंबई, कोलकाता, सोनिपत आणि रांची येथे या पूर्वी केबीडी जुनिअर्स चे आयोजन करण्यात आले होते आणि शेवटच्या टप्प्यातपुण्यात देखील केबीडी जुनिअर्सच्या आयोजनानाने या स्पर्धेची यशस्वी सांगता झाली.