पहा: थाला धोनीचे असे झाले मैदानावर स्वागत

चेन्नई । येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या वनडे सामन्यात भारताची अवस्था बिकट आहे. भारताचे पहिले ५ फलंदाज बाद झाले आहे.

जरी भारतीय संघाची अवस्था बिकट असली तरी चेन्नईच्या मैदानावर जेव्हा भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी फलंदाजीला येत होता तेव्हा त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. धोनीचा अतिशय मोठा चाहतावर्ग हा चेन्नईमध्ये आहे. धोनीने चेन्नई सुपर किंग्स संघाचे कर्णधारपद ८ वर्ष सांभाळले आहे. त्यामुळे अर्थातच धोनीला रांची शहरापेक्षाही हा शहरात जास्त प्रेम मिळते.

आज होत असलेल्या या सामन्यासाठी चेन्नई शहरात दाखल होणारा धोनी हा पहिला भारतीय खेळाडू होता. तो बुधवारीच या शहरात दाखल झाला होता. जेव्हा आज तो फलंदाजीसाठी मैदानात आला तेव्हा लोकांनी उभे राहून आपल्या या लाडक्या खेळाडूचे स्वागत केले.धोनीला मिळणारे हे प्रेम नक्कीच जगात मिळणाऱ्या कोणत्याही क्रिकेटपटूपेक्षा वेगळे आहे.

विडिओ: