फिरोज शहा कोटलाच्या गेटला वीरेंद्र सेहवागने नाव !

दिल्ली| उद्या सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील टी २० मालिकेच्या पूर्वसंध्येला आज दिल्ली क्रिकेट बोर्डाने भारताचा धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागचा दिल्लीच्या फिरोज शहा कोटला स्टेडिअमच्या गेट २ ला त्याचे नाव देऊन सन्मान केला.

मीडियाशी बोलताना सेहवाग म्हणाला, गेटला ड्रेससिंग रूमला तसेच स्टँडला माजी खेळाडूंची नावे दिल्यामुळे सध्या खेळत असलेल्या खेळाडूंना प्रेरणा मिळेल. तसेच दिल्लीकडून खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये सेहवाग पहिलाच खेळाडू आहे ज्याचे घेतला नाव देण्यात आले आहे.

या गेटवर सेहवागने विक्रम लिहिले आहेत तसेच महान खेळाडू अजरामर होतात (Legends are forever) अश्या अर्थाचे एक वाक्य या गेटवर लिहिले आहे.

सेहवागला त्याचा संघ सहकारी आशिष नेहराबद्दल विचारले असता तो म्हणाला “त्याबद्दल आपण उद्या बोलूया. आज माझा दिवस आहे.” उद्या आशिष नेहरा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळणार आहे. त्याने काही दिवसापूर्वीच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधें निवृत्त होणार असल्याचे सांगितले होते.

या सगळ्यात दिल्ली क्रिकेट बोर्डच्या पॅनलकडून एक चूक झाली आहे त्यांनी सेहवागने विक्रम लिहिताना असं लिहिले आहे कि “एकमेव भारतीय फलंदाज ज्याने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतकी खेळी केली आहे.” परंतु ते करूण नायरला विसरले आहेत. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी चूक सुधारून लिहिले कि एकमेव भारतीय फलंदाज ज्याने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये दोन त्रिशतकी खेळी केल्या आहेत आहे”

बीसीसीआयने याबद्दल ट्विट केले आहे.