७ डिसेंबर पासून महाराष्ट्राची कुमार-कुमारी निवड चाचणी कबड्डी स्पर्धा सेलू परभणी पासून रंगणार, स्पर्धेची गटवारीही जाहीर

महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या मान्यतेने परभणी जिल्हा कबड्डी असो. व ज्ञानसंगोपन सेवाभावी संस्था, जिंतूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ०७ ते १० डिसेंबर २०१८ या कालावधीत कुमार/ कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

सेलू – परभणी येथील कबड्डी महर्षी स्व. शंकरराव (बुवा) साळवी क्रीडानगरी, नूतन महाविद्यालय मैदान येथे होणाऱ्या कुमार गटाच्या स्पर्धेकरिता राज्य संघटनेला संलग्न असलेल्या सर्व म्हणजे २५ जिल्ह्यानी आपला सहभाग नोंदविला आहे, तर कुमारी गटात नंदुरबार व नांदेड वगळता इतर २३ जिल्ह्यांनी आपली खेळण्याकरिता अनुमती दर्शविली आहे.

सर्व सहभागी संघाची प्रथम साखळी व त्यानंतर बाद पध्द्तीने सामने खेळविण्यात येथील. गतवर्षाच्या कामगिरीवरून या स्पर्धेत प्रत्येक संघाला मानांकन देण्यात येतो. ही कामगिरी नंदूरबारचे बजरंग परदेशी पार पाडतात. या नामांकना प्रमाणे पाडलेली गटवारी आज राज्य संघटनेचे सरचिटणीस आस्वाद पाटील यांनी प्रसार माध्यमांसाठी जाहीर केली. ती खालील प्रमाणे.

कुमार (मुले):-
अ गट :- १)कोल्हापूर, २)परभणी, ३)नाशिक, ४)हिंगोली.
ब गट :- १)रत्नागिरी, २)पुणे, ३)सिंधुदुर्ग, ४)सातारा.
क गट :- १)सांगली, २)मुंबई उपनगर, ३)सोलापूर, ४)उस्मानाबाद.
ड गट :- १)जळगाव, २)पालघर, ३)नंदुरबार, ४)धुळे.
इ गट :- १)अहमदनगर, २)बीड, ३)रायगड, ४)औरंगाबाद.
फ गट :- १)मुंबई शहर, २)ठाणे, ३)लातूर, ४)जालना, ५)नांदेड.

कुमारी (मुली) :-
अ गट :- १)पुणे, २)पालघर, ३)सोलापूर.
ब गट :- १)सातारा, २)रायगड, ३)नाशिक, ४)जालना.
क गट :- १)रत्नागिरी, २)ठाणे, ३)बीड, ४)हिंगोली.
ड गट :- १)कोल्हापूर, २)सांगली, ३)उस्मानाबाद, ४)लातूर.
इ गट :- १)अहमदनगर, २)मुंबई शहर, ३)परभणी, ४)धुळे.
फ गट :- १)मुंबई उपनगर, २)सिंधुदुर्ग, ३)औरंगाबाद, ४)जळगाव.