कोण आहेत हे चित्रविचित्र कपडे घालून क्रिकेट खेळणारे लोक??

सध्या मासाई क्रिकेट क्लबची क्रीडाविश्वात जोरदार चर्चा आहे. लैकिपिया, केनिया येथील या जमातीने आपले खेळाबद्दलचे प्रेम क्रिकेटचा एक क्लब स्थापन करून व्यक्त केले आहे. सध्या याचे फोटो मोठ्या प्रमाणावर इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

मासाई ही केनियामधील एक जमात असून आपल्या जमातीत असणाऱ्या वाईट प्रथा आणि होणारे अन्याय यांच्याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी त्यांनी क्रिकेट या खेळाचा सहारा घेतला आहे. हा क्लब female genital mutilation (FGM) सारख्या प्रकारावर यातून संदेश देऊ इच्छितो. तसेच बालविवाहासारखे प्रकार रोखू इच्छितो.

लवकर होणाऱ्या विवाहांमुळे एड्स/ एचआयव्ही यांची लागण होण्याचे प्रमाण वाढते. क्रिकेटच्या माध्यमातून या जमातीच्या लोकांना याबद्दल जनजागृती करायची आहे.

लैकिपिया, केनिया येथे २००७ साली प्रथम क्रिकेट खेळण्यात आले होते. २००९ साली मासाई जमातीने मासाई क्रिकेट वॉरियर्स असा एक क्रिकेट क्लब बनवला आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले. female genital mutilation (FGM) कृती २०११साली केनियातून हद्दपार होऊनही आजही मासाई समाजात ही कृती केली जाते. त्याचसाठी हा समाजच पुढे आला आहे.

मासाई समाज हा पूर्णपणे आदिवासी समाज नसून हा समाज मुख्यत्वे टांझानिया आणि केनियामध्ये आढळतो.

photo courtesy: http://www.theaustralian.com.au