प्रो कबड्डीचा ‘जॅक कॅलिस’ मनजीत चिल्लरचा मोठा पराक्रम

दिल्ली। गुरुवारी(6 डिसेंबर) प्रो कबड्डी 2018 च्या स्पर्धतील 99 वा सामना दबंग दिल्ली विरुद्ध तमिळ थलायवाज संघात पार पडला. या सामन्यात दबंग दिल्लीने 37-33 अशा फरकाने विजय मिळवला.

असे असले तरी तमिळ थलायवाजचा स्टार अष्टपैलू मनजीत छिल्लरसाठी खास ठरला आहे. त्याने या सामन्यात 2 टॅकल पॉइंट मिळवताना प्रो कबड्डीच्या इतिहासात 300 टॅकल पॉइंट मिळवण्याचा टप्पाही पार केला.

प्रो कबड्डीत 300 टॅकल पॉइंट मिळवणारा तो पहिलाच कबड्डीपटू ठरला आहे. आत्तापर्यंत अशी कामगिरी कोणालाही करता आली नव्हती.

या सामन्याआधी त्याला 300 टॅकल पॉइंट् पूर्ण करण्यासाठी फक्त एका पॉइंटची आवश्यकता होती. त्यानेही या सामन्यात 2 टॅकल पॉइंट घेत हा 300 टॅकल पॉइंटचा टप्पा पार केला.

त्यामुळे आता त्याने प्रो कबड्डीमध्ये 91 सामन्यात 301 पॉइंट्स मिळवले आहेत. तसेच प्रो कबड्डीमध्ये सर्वाधिक ‘हाय-5’ देखील मनजीतच्या नावावर आहेत. तसेच त्याने 3.31 च्या सरासरीने 13 सुपर टॅकल केले आहेत.

त्याने या स्पर्धेत ९१ सामन्यात एकूण ५२१ गुण घेतले आहेत. तर प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमात मनजीतने 17 सामन्यात 58 टॅकल पॉइंट्स मिळवले आहेत.

प्रो कबड्डीमध्ये सर्वाधिक टॅकल पॉइंट्स मिळवणारे खेळाडू-

301 पॉइंट्स – मनजीत छिल्लर (91 सामने)

255 पॉइंट्स – रविंद्र पहल (86 सामने)

248 पॉइंट्स – संदीप नरवाल (98 सामने)

240 पॉइंट्स – मोहित छिल्लर (90 सामने)

222 पॉइंट्स – सुरेंदर नाडा (71 सामने)

महत्त्वाच्या बातम्या:

७ डिसेंबर पासून महाराष्ट्राची कुमार-कुमारी निवड चाचणी कबड्डी स्पर्धा सेलू परभणी पासून रंगणार, स्पर्धेची गटवारीही जाहीर

हॉकी विश्वचषक २०१८: स्पर्धेत टिकून राहण्यासाठी इंग्लंड-आयर्लंड संघात रंगणार सामना

हॉकी विश्वचषक २०१८: चिवट चीनसमोर गतविजत्या ऑस्ट्रेलियाला रोखण्याचे आव्हान