- Advertisement -

एशियन कबड्डी चॅम्पिअनशिप सामन्यांचे प्रक्षेपण व्हायला पाहिजे होते- दीपक हुडा !

0 2,534

भारतीय कबड्डी संघाने रविवारी एशियन कबड्डी चॅम्पिअनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा धुव्वा उडवत विजय मिळवला होता. हा सामना पूर्णपणे एकतर्फी झाला होता. तसेच त्यांनी या स्पर्धेत साखळी फेरीत इराक, अफगाणिस्तान आणि जपानचा तर उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाचा पराभव केला होता.

पण भारताच्या या विजयाचा आनंद भारतीय जनतेला ही स्पर्धा टेलिकास्ट केली नसल्याने पूर्णपणे घेता आला नाही. नुकत्याच झालेल्या ३ महिन्याच्या प्रो कब्बडी लीगचे स्टार स्पोर्ट्सवरून वेगवेगळ्या भाषेत टेलिकास्ट करण्यात आली होती. ते बघता या स्पर्धेलाही टेलिकास्ट करायला हवे होते.

याबद्दल भारतीय कबड्डी स्टार दीपक हुडा स्पोर्टसकिडाशी बोलताना म्हणाला,” हे खूप वाईट आहे की ही स्पर्धा टीव्हीवर दाखवली गेली नाही”

तसेच तो पुढे म्हणाला, “या सारख्या स्पर्धाना टीव्हीवर दाखवण्यात यायला हवे. प्रो कबड्डीत आम्हाला खेळताना संपूर्ण भारतात बघितले जाते. हे आम्हाला आवडते. त्याचबरोबर आम्हीसुद्धा आम्हाला टीव्हीवर बघू शकतो.”

“आयोजकांनी भारतात हे सामने टेलिकास्ट करण्याची व्यवस्था करायला हवी होती. जर असे झाले असते तर आम्हाला आनंद झाला असता की आम्हाला खेळताना लोकांनी पहिले आहे ज्यामुळे आम्हाला आणखी प्रेरणा मिळाली असती.”

या स्पर्धेत दीपक हुडा आणि सुरजीत सिंगने महत्वाची भूमिका बजावली होती.

Comments
Loading...
%d bloggers like this: