असा असेल पुणेरी पलटणचा मुख्य संघ!

पुणेरी पलटणचा संघ यंदाच्या मोसमात समतोल संघ भासतो आहे. दिपक निवास हुड्डा संघाचा कर्णधार असून उत्तम रेडर आहे. संघात रेडींगसाठी दिपक निवास हुड्डा, उमेश म्हात्रे, आकाश जाधव, तर डू ऑर डाय रेडसाठी राजेश मंडल आहे तर डिफेन्समध्ये अनुभवी धर्मराज चेरलाथन, गिरीश एर्नेक तर कबड्डी विश्वचषकात आपल्या डिफेंसिव्ह खेळणे सर्वांना प्रभावित करणारा बांगलादेशी खेळाडू महंमद जियाउर रेहमान आहे. पुणेरी संघाला ऑल राउंडर म्हणून संदीप नरवाल हा ताकदीचा खेळाडू मिळाला असून त्यामुळे संघ समतोल होण्यात चांगलेच यश मिळाले आहे.

प्रो कबड्डीमध्ये नवखे असणारे उमेश म्हात्रे,आकाश जाधव हे महाराष्ट्रीयन खेळाडू पुणेरी संघात आहेत ते रिडींगमध्ये काही कमाल करून दाखवायला उत्सुक आहेत. पुणेरी पलटणचा संघ सिंबायोसिसआंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या मैदानावर सराव करत आहे. सरावात ते रिडींग आणि डिफेन्सच्या पूरक जोड्या बनवत आहेत.सरावात जी जोडी उत्तम खेळ खेळेल त्याला संघात स्थान मिळण्याची जास्त संधी आहे.

रेडींगमध्ये राजेश मंडल आणि दिपक  निवास हुड्डा हे दोघे निश्चित असले तरी तिसरा मुख्य रेडर निश्चित नाही तो उमेश म्हात्रे आणि आकाश जाधव यापैकी  असणार आहे. डिफेन्समध्ये धर्मराज चेरलाथन हे राइट कॉर्नर आणि लेफ्ट कॉर्नर दोन्ही खेळतात तर त्यांची जागा निश्चित नाही, गिरीश एर्नेक हा देखील लेफ्ट कॉर्नर खेळतो तर बांगलादेशी रेहमान देखील लेफ्ट कॉर्नर खेळतो.

संदीप अष्टपैलू खेळाडू असला तरी मागील काही मोसमात लेफ्ट कॉर्नरवर उत्तम खेळ केला आहे पण संदीप राइट कव्हर देखील खेळतो तर त्याची जागा देखील निश्चित नाही. रवी कुमार पुणेरी पलटणचा आणखी एक डिफेंडर तो  राइट कॉर्नर खेळतो . पुणेरी संघात कोणता खेळाडू कोणत्या जागेवर खेळेल हे कोडे बनले आहे. ते कोडे सोडण्याचा प्रयत्न सरावामध्ये सुटावा अशी अपेक्षा पुणेरी पलटणचे प्रशिक्षक बी सी रमेश बाळगून असतील.

असा असेल पुणेरी पलटणचा मुख्य संघ.
१ दिपक  निवास हुड्डा
२ राजेश मंडल
३ उमेश म्हात्रे
४ संदीप नरवाल
५ महंमद झियाउर रेहमान
६ गिरीश एर्नेक
७ धर्मराज चेरलाथन