आज या ११ खेळाडूंना देण्यात आले चेन्नईकडून संधी

पुणे। आज पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात राजस्थान संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. 

हा चेन्नईचा चौथा तर राजस्थानचा पाचवा सामना आहे. याआधी चेन्नईने पहिल्या दोन सामन्यात अनुक्रमे मुंबई इंडियन्स आणि कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध विजय मिळवला आहे. पण त्यांना मागच्या सामन्यात किंग्ज ईलेव्हन पंजाब विरूद्ध पराभवाला सामोरे जावे लागले आहे. 

तसेच राजस्थानने 4 सामन्यांपैकी दिल्ली डेयरडेविल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूद्ध विजय मिळवला आहे, तर सनरायजर्स हैद्राबाद आणि कोलकता नाईट रायडर्स विरूद्ध पराभव स्विकारला आहे. 

असा आहे चेन्नईचा संघ-एमएस धोनी (कर्णधार), शेन वॉटसन, आंबती रायडू,  सुरेश रैना, सॅम बिलिंग्स, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, दीपक चाहर,कर्ण शर्मा, शार्दूल ठाकूर,  इम्रान ताहीर

असा आहे राजस्थानचा संघ-अजिंक्य राहणे (कर्णधार), राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन,बेन स्टोक्स,जॉस बटलर, हेनरीच क्लासेन, स्टुअर्ट बिन्नी, कृष्णप्पा गॉथम, श्रेयश गोपाळ , जयदेव उनाडकट, बेन लाफ्लिन,