धोनीला डच्चू पक्का होता, परंतु या कारणामुळे झाली निवड

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघाची सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे.

या दौऱ्यात 5 वनडे आणि 3 टी20 सामन्यांच्या मालिका होणार आहेत. या मालिकांसाठी बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या मर्यादीत षटकांच्या मालिकांसाठी संघाची घोषणा केली आहे.

या घोषित झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघात माजी कर्णधार एमएस धोनीचे पुनरागमन झाले आहे. त्याचा याआधी विंडीज आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी20 मालिकेत समावेश करण्यात आला नव्हता.

त्याच्या या पुनरागमनाबद्दल सांगताना निवड समीतीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद म्हणाले, ‘आम्ही आधीच सांगितले होते की आम्ही धोनीला सहा सामन्यासाठी आराम देत आहोत. ज्यामुळे आम्ही रिषभ पंत आणि दिनेश कार्तिकला वेळ देऊ शकतो. हेच कारण होते धोनीला संघाबाहेर ठेवण्याचे. कार्तिक आणि पंतने आता बरेच सामने खेळले आहेत. त्यामुळे धोनीला परत संघात स्थान देण्यात आले आहे.’

‘पंत खूप दिवसापासून खेळत आहे. त्यामुळे त्याला विश्रांती देत आहे, ज्यामुळे तो फ्रेश राहिल.त्याने इंग्लंड दौऱ्यात इंग्लंड लायन्स संघाविरुद्ध पाच वनडे सामन्यात चांगली कामगिरी केली होती.’

त्याचबरोबर पुढे प्रसाद म्हणाले, ‘जसा जसा विश्वचषक जवळ येत आहे, तसे आमच्याकडे खूप कमी वनडे सामने राहिले आहेत. आमच्याकडे 20 जणांचा संघ आहे. या 20 जणांमधूनच विश्वचषकासाठी संघ निवडला जाणार आहे.’

त्याचबरोबर बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की ‘आता फक्त 8 वनडे सामने खेळायचे आहेत. त्यामुळे निवडकर्ते धोनीला विश्वचषकाआधी पूर्ण वेळ देण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे न्यूझीलंड विरुद्धच्या तीन टी20 सामने धरुन धोनी एका महिन्यात 11 सामने खेळणार आहे.’

भारतीय संघ 12,15 आणि 18 जानेवारीला अनुक्रमे सिडनी, अॅडलेड आणि मेलबर्न येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सामने खेळणार आहे. तसेच त्यानंतर न्यूझीलंड विरुद्ध 23,26,28, 31 जानेवारी आणि 3 फेब्रुवारी असे पाच वनडे सामने होणार आहेत. तस 6,8 आणि 10 फेब्रुवारीला टी20 सामने होणार आहेत.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ –

विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, अंबाती रायडू, दिनेश कार्तिक, एमएस धोनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, मोहम्मद शमी.

न्यूझीलंड विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ –

विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद.

महत्त्वाच्या बातम्या:

चुकीला माफी नाही? मयांक अगरवालची त्या व्यक्तीने मागितली माफी

वाचा पहिला डाव घोषीत करण्याचा कोहलीचा निर्णय चूक की बरोबर

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा मुर्खपणा, म्हणे कोहलीने क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी