आॅस्ट्रेलियन क्रिकेट मालिकांच्या प्रेक्षपणासाठीचा करार तब्बल 918 मिलीयन डाॅलरचा

टिव्ही कंपनी फाॅक्सटेल  व फ्री टू एअर सेवन नेटवर्कने आॅस्ट्रेलियन क्रिकेट मालिकांच्या प्रक्षेपणासाठीचे पुढील सहा वर्षोचे हक्क विकत घेतले आहेत. हा करार तब्बल 918 मिलीयन डाॅलरचा आहे.

आॅस्ट्रेलियन  क्रिकेटमध्ये झालेल्या स्टीव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांचे निलबंन तसेच चेंडू छेडछाड प्रकरणानंतर रायवल नाईन नेटवर्क व टेन नेटवर्कने आॅस्ट्रेलीयन  क्रिकेट बोर्डाशी असलेला चार दशके जुना करार मोडला होता.

नवीन करारानुसार, देशांतर्गत कसोटी सामन्यांच्या प्रक्षेपणाचा हक्क फाॅक्सटेल व फ्री टू एअर सेवन नेटवर्क यांच्याकडे असणार आहे तर एकदिवसीय व टी20 आंतराष्ट्रीय  सामन्यांच्या प्रक्षेपणाचा हक्क फाॅक्स टिव्हीकडे असणार आहेत.

दोन्ही कंपन्या महिलाचे सर्व आंतराष्ट्रीय सामने व  बिग बॅश लीगच्या 16 सामन्यांचे प्रेक्षपण करणार आहे.  तसेच  फाॅक्सटेल  व फ्री टू एअर सेवन नेटवर्क या दोन्ही कंपन्या एकाच वेळेस पुरुषांच्या बिग बॅश लीगच्या 43 सामन्यांचे  व 16 खेळांचे प्रक्षेपण करणार आहे.

फाॅक्स टिव्ही व आॅस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड यांच्यामध्ये  डिजीटल करार देखील झाला आहे.