सुपर ओव्हरमध्येही झाला सामना टाय; असा झाला सामन्याचा निर्णय

0 224

महिलांच्या बिग बॅश लीगमध्ये काल क्रिकेटमधील एक दुर्मिळ क्षण बघायला मिळाला. मेलबर्न स्टार्स विरुद्ध मेलबर्न रेनिगेड्स यांच्यातील सामना सुपर ओव्हरमध्येही टाय झाला. त्यामुळे या सामन्याचा निकाल आयसीसीच्या नियमानुसार ज्या संघाने सामन्यात जास्त बाउंड्रीज मारल्या आहेत त्यांना विजेते घोषित करण्यात आले.

या सामन्यात मेलबर्न स्टार संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद ११८ धावा केल्या होत्या. ११९ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या मेलबर्न रेनिगेड्स संघानेही २० षटकात ६ बाद ११८ च धावा केल्या. यामुळे हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.

सुपर ओव्हरमध्ये मेलबर्न रेनिगेड्स संघाने प्रथम फलंदाजी केली. त्यांनी ४ बळींच्या मोबदल्यात १० धावा केल्या. याचे प्रतिउत्तर म्हणून मेलबर्न स्टार्स संघाच्याही बिनबाद १० च धावा झाल्या. त्यामुळे अखेर मेलबर्न स्टार्स संघाला सामन्यात सर्वात जास्त बाउंड्रीज मारल्यामुळे विजयी घोषित करण्यात आले.

त्यांनी सामन्यात एकूण ९ बाउंड्रीज मारल्या. यात ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. तर मेलबर्न रेनिगेड्स संघाने ६ चौकार आणि आणि २ षटकारांच्या साहाय्याने ८ बाउंड्रीज मारल्या.

मेलबर्न स्टार्स संघाकडून लिझेल ली तर मेलबर्न रेनिगेड्स संघाकडून एमी सेटरथवेट यांनी त्यांच्या संघाकडून सर्वाधिक धावा केल्या. या दोघींनीही ३१ धावा केल्या.

असा आहे आयसीसीचा नियम :

जर सामना सुपर ओव्हरमध्येही टाय झाला तर ज्या संघाने सामन्यात सर्वाधिक बाउंड्रीज मारल्या असतील त्या संघाला विजयी घोषित केले जाते.

Comments
Loading...
%d bloggers like this: