हे माहित आहे का? ८००वा वनडे सामना प्रत्येक देश हरला आहे !

जगात आजपर्यत २६ वेगवेगळ्या संघानी कमीतकमी १ वनडे सामना खेळला आहे. परंतु त्यातील केवळ ४ संघांना ८०० किंवा त्यापेक्षा जास्त वनडे सामने खेळण्याचं भाग्य लाभलं आहे.

भारत देश सर्वाधिक ९१९ वनडे सामने खेळला आहे तर ऑस्ट्रेलिया संघ सार्वधिक ५५४ वनडे सामने जिंकला आहे. भारतीय संघ तब्बल ४०५ वनडे सामने हरला देखील आहे. सार्वधिक बरोबरी झालेले ९ सामने ऑस्ट्रेलिया तर सर्वाधिक निकाल न लागलेले सामने ४० भारत खेळला आहे. अमेरिकेचा संघ सर्वात कमी अर्थात २ वनडे सामने खेळला असून दोनही सामने हरला आहे.

हे रेकॉर्ड विशेष:
जे ४ देश ८०० पेक्षा जास्त वनडे सामने खेळले आहेत ते त्यांचा ८००वा सामना हरले आहेत. सर्वात प्रथम अर्थात २०१२ साली भारत आपला ८००वा वनडे सामना ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध पराभूत झाले. त्याच वर्षी ऑस्ट्रेलिया आपला ८००वा सामना पाकिस्तान संघाविरुद्ध पराभूत झाले.

पाकिस्तान संघ २०१३ साली आपला ८००वा वनडे सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभूत झाले तर काल भारताविरुद्ध श्रीलंका आपला ८००वा सामना पराभूत झाले. अशा प्रकारे ८००वा सामना खेळलेले सर्व संघ त्या सामन्यात पराभूत झाले आहेत.

सध्या विंडीजचा संघ ७६२ वनडे सामने खेळलेला आहे आणि हा संघ लवकरच आपला ८०० वा सामना खेळेल. तेव्हा हा संघ हा नको असलेला विक्रम आपल्या नावे ठेवतो की नाही याची क्रिकेटप्रेमींना नक्की उत्सुकता असेल.